NEET परीक्षेचा निकाल लागण्यापुर्वी विद्यार्थांनो 'हे' नक्की करा; NTA ची महत्त्वपु्र्ण सुचना

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 25 September 2020

www.ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले, नीटचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज काळजीपुर्वक तपासावा, अर्जात चुका असल्यास दुरुस्ती करावी, निकलानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट परीक्षा अर्जात काही महत्त्वपूर्ण बदल करण्याच्या सूचना नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. यासंदर्भात www.ntaneet.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले, नीटचा निकाल लागण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज काळजीपुर्वक तपासावा, अर्जात चुका असल्यास दुरुस्ती करावी, निकलानंतर अर्जात कोणताही बदल करता येणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले, त्यामुळे परीक्षा अर्जात बदल करण्याची अंतिम संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे.

अर्जात कोणते बदल करता येणार?

ज्या विद्यार्थ्यांनी 13 सप्टेंबर 2020 रोजी नीट परीक्षा दिली. त्या विद्यार्थ्यांना नीट परीक्षा अर्जा पुन्हा बदल करता येणार आहे. संकेतस्थळावर दिलेल्या लिंकमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आई - वडिलांचे नाव, लिंग, कॅटेगिरी, पर्सन विथ डिसेबिलिटी, स्टेट कोड, नागरिकत्व अशा प्रकारच्या दुरुस्त्या करता येणार आहेत. त्यासाठी 30 सप्टेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुरुस्ती करता येणार आहे तर 30 सप्टेंबर 2020 रात्री 11:50 पर्यंत परीक्षा शुल्क भरण्याची वेळ देण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना शुल्क भरावे लागणार का?

विद्यार्थ्यांनी अर्जात केलेल्या दुरुस्तीनुसार  शुल्क आकारण्यात येणार आहे. साधी दुरुस्ती असेल तर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही मात्र, मेजर दुरुस्ती असेल तर परीक्षा शुल्क भावे लागणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग असे विविध पर्याय उपलब्ध करु देण्यात आले, या पर्यायाचा उपयोग करुन शुल्क भरता येणार  आहे.

अशा प्रकारे अर्जात दुरुस्ती करणे टाळा?

विद्यार्थ्यांना फक्त संकेतस्थळावर जाऊन आपल्या अर्जात बदल करता येणार आहे. याव्यतिरिक्त ईमेल, फॉक्स, पत्र याद्वारे अर्जात कोणताही बदल केला जाणार नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्जात बदल करण्यासाठी ईमेल, फॅक्स, पत्र आणि ऑफलाईन पद्धीचा उपयोग करू नयेत, असा बदल ग्राह्य धरला जाणार नाही, ही अत्यंत महत्वाची सूचना विद्यार्थ्यांना दिली आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News