राष्ट्रीय पातळीवर कुरूमचे विद्यार्थ्यांची विजयी रेलचेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 20 December 2019

कुरूम: स्थानिक पंचशील शिक्षण संस्थाद्वारे संचालित पंचशील विद्यालय तथा जि.एम.टेकाडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी मिनी गोल्फ स्पर्धेत राज्य स्तरावर सहभाग घेवून यामधील दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

कुरूम: स्थानिक पंचशील शिक्षण संस्थाद्वारे संचालित पंचशील विद्यालय तथा जि.एम.टेकाडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी मिनी गोल्फ स्पर्धेत राज्य स्तरावर सहभाग घेवून यामधील दोन विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे.

वाशीम जिल्ह्यातील कामरगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या मिनी गोल्फ राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेवून त्यांनी घवघवीत यश मिळविले. यामध्ये महाविद्यालयाची इयत्ता अकरावी विज्ञान व कला शाखेच्या प्रशिता खलोरकर, आचल बेलोकार, पूजा काळे, प्रतिक्षा गेडाम या विद्यार्थिनींनी विभागीय स्पर्धेतून राज्यस्तरीय स्पर्धेत विजय मिळविला.त्यामधून प्रशिता नारायण खलोरकर व आचल संजय बेलोकार या दोन विद्यार्थिनींची १९ वर्षे वयोगटातून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली. 

येत्या २३ ते २७ डिसेंबर या कालावधीत मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे स्पर्धेसाठी रवाना होत आहे. आपल्या यशाचे श्रेय क्रीडा शिक्षक एस. डी. मडघे व क्रीडा शिक्षक के. आर. कांडलकर तसेच आई वडिलांना देतात. यावेळी राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू विद्यार्थिनींचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक तथा प्राचार्य आर.एस.कुंभारे व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद  आदींनी कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News