पेपर तपासणीचे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे उपलब्ध: CBSE

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 15 July 2020

बोर्डाने दिलेल्या मार्कवर विद्यार्थी असमाधानकारी असतील तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण विद्यार्थ्यांनी दिलेले पेपर पुन्हा तपासण्यासाठी मार्क्स व्हेरिफिकेशन आणि रि ईव्यल्युयशन दोन पर्याय उपलब्ध करुन दिली आहे.

सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा काळात कोरोनाचा संसर्ग वाढला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा महाविद्यालये बंद करण्यात केली आणि परीक्षांना स्थगीती देण्यात आली. परीक्षा दिलेल्या पेपरच्या सरासरी गुणांकावर आणि अंतर्गत परीक्षांच्या मार्कावर दहावीचा निकाल लावण्यात आला. त्यामुळे यंदा निकालात बराच गोंधळ झाला. बोर्डाने दिलेल्या मार्कवर विद्यार्थी असमाधानकारी असतील तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण विद्यार्थ्यांनी दिलेले पेपर पुन्हा तपासण्यासाठी मार्क्स व्हेरिफिकेशन आणि रि ईव्यल्युयशन दोन पर्याय उपलब्ध करुन दिली आहे. सोडवलेल्या उत्तर पत्रिका असमाधानी विद्यार्थी पुन्हा पाहू शकतात. उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी आणि मार्कांचे पुनर्रमुल्यांकन करु शकतात. त्यासाठी एनसीआयईच्या अधिकृत संकेतस्थळावर जाईन अर्ज करावा लागले. त्यानंतर शुल्क भरुन उत्तर पत्रिकेची फोटो कॉपी मिळेल. 

मार्क वेरिफिकेशन

मार्क वेरिफिकेशनसाठी १७ जुलै ते २१ जुलै दरम्यान ऑनलाईन अर्ज करायचा आहे. त्यानंतर ५०० रुपये फी भरुन वेरिफिकेशन होईल. सर्वप्रथम विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका तपासली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक आणि नाव तापसले जाते. उत्तर पत्रितेवरचे मार्क आणि निकालावरचे मार्क समान आहेत का याची पडताळनी केली जाते.

पुनर्रमुल्यांकन

पुनर्रमुल्यांकनासाठी ६-७ ऑगस्ट दोन दिवस अर्ज करण्यासाठी देण्यात आले आहेत. त्यानंतर ५०० रुपये फी भरावी लागणार आहे. पुनर्रमुल्यांकनात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातात. पेपर तपासण्यासाठी एक समिती स्थापन केली जाते, त्या समितीद्वारे पेपर पुन्हा तपासले जातात. आणि पुन्हा मार्कींगची बेरीज केली जाते. मार्कात कमतरता आढळल्या दुरुस्ती करुन दिले जाते. 

फोटो कॉपी

विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिकेचे फोटो मिळवण्यासाठी २ ऑगस्ट पर्यंत अर्ज करण्याची तारीख दिली आहे. त्यासाठी ७०० रुपये फी आकारण्यात आली. फी भरल्यानंतर विद्यार्थ्यांना उत्तपत्रिकेची फोटो कॉपी दिली जाते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News