विद्यार्थ्यांने तयार केली आता निखिलने केलेला लिटिल कारचा प्रयोग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 23 September 2020

विद्यार्थ्यांने तयार केली आता निखिलने केलेला लिटिल कारचा प्रयोग

वर्धा -  अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासून वेगळं वेडं असतं. त्यामुळे ते शाळा झाल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर तो छंद जपतं असतात असं म्हणायला हरकत नाही. कारण अनेक विद्यार्थ्यांना लहानपणापासून गाड्याचं प्रचंड वेडं असतं. अशी मुलं प्रत्येकवेळी बाजारात गेल्यानंतर नवीन गाडी घेत असतात आणि ऑघरी आल्यानंतर ते खोलून आतली यंत्रणा कशी आहे हे पाहत असतात. तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये मुलं तुम्हाला भेटत असतात. हीचं मुलं पुढं मोठी झाल्यानंतर प्रयोग करत एखादी गाडी तयार करतात. असा प्रकार वर्धा जिल्ह्यात घडला आहे. एका विद्यार्थ्यांने सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे.
 
या मुलाचं नाव निखिल सोमनाथे असं असून तो सध्या नववीच्या वर्गात शिकत आहे. विशेष म्हणजे निखिलने ३० दिवसात सौर ऊर्जेवर चालणारी लिटील कार बनवली आहे. लॉकडाउन काळात वेळ असल्याने निखिलने गाडी बनविण्याचा निर्णय घेतला आणि तो त्याला केलेला प्लॅन यशस्वी झाला आहे. तयार केलेली ही कार आता रस्त्यावर धावू लागली आहे.
 
कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झाल्यानंतर लॉकडाउन करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतर निखिलने फावल्यावेळेत काय करायचं म्हणून गाडी बनवण्याचा निर्णय घेतला आणि तो यशस्वी झाला. कारण तयार केलेली गाडी आता रस्त्यावर फिरू लागली त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक केलं जातंय. गाडी बनवण्याची संकल्पाना त्याच्या डोक्याच आल्यानंतर त्याने साहित्य जमा करायला सुरूवात केली. कार बनवण्यासाठी लागणारं साहित्य सायकलच्या दुकानातून खरेदी केलं. लहान सायकलच्या चाकाच्या साहाय्याने लोखंडी रॉड, लाकडी प्लायवूड ,बॅटरी,जुन्या चार चाकी गाडीचे स्टिअरिंग अशा वस्तूंचा वापर करत त्याने ही कार बनवली आहे.
 
निखिलने तयार केलेल्या कारचे अनेक फायदे असल्याचे निखिलचे मत आहे. ही कार पुर्णपणे प्रदुषण मुक्त असून तयार करण्यासाठी निखिलला २० हजार रूपयांचा खर्च आला आहे. सध्या तयार केलेली कार १०० किलोपर्य़ंत वाहून नेण्याची क्षमता आहे. कारमध्ये सोलार पॅनेल असल्यामुळे सोलार पॅनेलच्या माध्यमातून ही कार चार्ज केली जाते. तसेच आपण गाडी चालवत असताना बॅटरी संपत आल्यास बॅकअप मिळतो.
विशेष म्हणजे निखिलला अशा छोट्या कार तयार करण्याचा लहानपणापासून छंद आहे. त्याने लहान असताना सुध्दा असा प्रयोग केला आहे. त्याचबरोबर  आर.सी. रिमोट कंट्रोलर मोटर बोर्ड, रिमोट कंट्रोल ड्रोन, पेरणी यंत्र ,सोलर कुलर अशी यंत्रं बनवली आहेत. आता निखिलने केलेला लिटिल कारचा प्रयोग यशस्वी झाल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News