एनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात

डाॅ गुणवंत सरवदे
Sunday, 18 October 2020

जे विद्यार्थी एनएसएसमध्ये नाहीत त्यांच्यासाठी माझं आवाहन आहे की आपण इतर शिक्षण घेतोच पण एक वेगळी कार्यशाळा म्हणून सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी एनएसएसकडे पाहावं. याने आपल्याला एक चांगला मार्ग मिळतो.

ओळख एनएसएसचीः डाॅ गुणवंत सरवदे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

एनएसएसमध्ये विद्यार्थी स्वाभिमान आणि आत्मविश्वास कमावतात

डाॅ गुणवंत सरवदे यांनी विद्यालयीन जिवनापासूनच एनएसएसचा विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यालय बार्शी इथून सुरुवात केली.  विद्यालयीन जीवनाची दोन वर्ष पूर्ण झाली पण तरी एनएसएसची आवड म्हणून तिसऱ्या वर्षी स्वेच्छेने एनएसएसमध्ये काम केलं. प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून ८ वर्ष त्यांनी त्यांचे काम सुरु ठेवले. हा त्यांचा प्रवास पुढे कसा चालू राहिला याची माहिती डाॅ गुणवंत यांनी यिनबझला दिली.

एनएसएस हे माझं पॅशन आहे. म्हणून मी एनएसएसशी जोडलो गेलो आहे. लॉकडाऊनच्या आधी कॉलेजमध्ये आषाढीवारी मध्ये प्रबोधन करत. त्या काळात पावसाळा असतो, दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक आल्याने अस्वछता खुप होते. वारी संपल्यानंतर आम्ही मंदिर स्वछ करतो, विद्यार्थ्यांना आणि गावकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी  राज्यस्तरीय कॅम्प घेतो. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली आणि महाराष्ट्र संचलन होते तेव्हा एक एनएसएसचा ग्रूप त्यात सहभागी असतो. त्यांना मी दोन वेळा प्रशिक्षण दिले आहे. एक वर्ष आपत्ती व्यावस्थापनावर तीन दिवसीय कार्यशाळा घेतली. वृक्षारोपण, ग्रीन कॅम्पस, ग्रीन व्हीलेज ही संकल्पना राबवत या काळात ३३ कोटी वृक्ष लागवड कॅम्पस मध्ये आणि ग्रामीण भागात केली. लॉकडाउनच्या काळात कोरोना वाॅरीयर, जनजागृती, कोरोनाचे गैरसमज दूर केले. आरोग्य सुधारण्यासाठी फिट इंडिया, योगाचं महत्व सांगितले.

जेव्हा मुलं पहिल्या वर्षी एनएसएसमध्ये येतात तेव्हा त्यांना काही माहिती नसतं कि एनएसएस काय आहे? त्यामुळे उद्घाटनाच्या वेळी मी नेहमी मुलांना सांगतो कि तुम्ही आता आला आहात आणि आता मातीचा गोळा आहात, त्या मातीला आकार देऊन माठ  कसा बनवायचा?, तो माठ भाजून पूर्णपणे परिपक्व कसा बनवायचा, हे आमचं काम आहे. परिपक्व माठ टणटण वाजतो, पण कच्चा माठ डबडब वाजतो. आपण नेहमी टणटण वाजणाराच माठ विकत घेतो. ज्या वेळी माझा स्वयंसेवक या दोन वर्षांनंतर बाहेर पडेल, तेव्हा तो टणटण वाजला पाहिजे. तो समाजामध्ये जगण्यासाठी परिपक्व झाला पाहिजे. मला आनंदाने सांगावं वाटत कि जी मुलं यातून जातात, ती मुलं सांगतात कि आम्ही  फक्त एनएसएसमुळे घडलो, आमची वैचारिक पातळी बदलून समाजाकडे बघण्याचा आणि समाजामधे  वावरण्याचा आमचा दृष्टीकोन बदलला.

जे विद्यार्थी एनएसएसमध्ये नाहीत त्यांच्यासाठी माझं आवाहन आहे की आपण इतर शिक्षण घेतोच पण एक वेगळी कार्यशाळा म्हणून सकारात्मक दृष्टीकोनातून त्यांनी एनएसएसकडे पाहावं. याने आपल्याला एक चांगला मार्ग मिळतो. ज्यावेळेस आपण मागे वळून पाहतो त्या वेळी मी काय केलं? हा विचार पडतो. पैसे सगळे कमवतात पण त्यावेळी माझा एनएसएसचा विद्यार्थी नक्की सांगतो मी समाजासाठी नक्की काहीतरी केलं आहे. माझी तमाम विद्यार्थी मित्रांना विनंती आहे. त्यांनी दोन वर्ष एनएसएसमध्ये येऊन ज्ञान घ्यावं, स्वाभिमान, आत्मविश्वास कमवावा. पहिला लाजरा बुजरा मुलगा, पूर्णपणे आत्मविश्वासाने बोलायला लागतो, हे पाहून आम्ही आश्चर्यचकित होतो. कोरोनाने पूर्ण मानवी समाज अस्तव्यस्त झाला आहे. पण काळजी घेऊन आपण ही परिस्थिती सावरू शकतो. एखाद्याला जर कोरोना झाला तर त्याच्या पूर्ण घराला वेगळं पाडलं जायचं पण त्याला दूर राहायला सांगितलंय, वेगळं पाडायला नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News