विद्यार्थ्यांनी तयार केली, एलपीजी गॅसवर चालणारी अनोखी दुचाकी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020

आत्तापर्यंत आपण सर्वांनी काही चारचाकी गाड्या या पेट्रोल आणि एलपीजीवरती चालताना पाहिल्या आहेत. पण आम्हाला वाटतं होतं की अशी एखादी मोटारसायकल असावी. आम्ही त्याअनुशंगाने प्रयत्न सुरू केले. अखेर त्या कामात आम्हाला यश आलं असं गाडीची निर्मिती करणा-या विद्यार्थ्यांनी सांगितलं.

विद्यार्थ्यांनी तयार केली, एलपीजी गॅसवर चालणारी अनोखी दुचाकी

पेट्रोलचे नेहमी दर वाढत असतात, ते अनेकांना परवडतही नाहीत म्हणून अनेक कंपन्यांनी इलेक्ट्रीक बाईकचं उत्पादन सुरू केलं. पण मालेगावच्या मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणा-या दुचाकीचा शोध लावला आहे. आत्तापर्यंत एलपीजीवर चालणा-या मोटारसायकल आपण रस्त्यावर पाहिलेल्या नाहीत. पण विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या बाईकचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मोहम्मद अनस, शफिक अहमद, मोहम्मद जुनेद, यमान अशहर या मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणा-या दुचाकीचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे आपण सध्या पाहत असलेल्या सर्व मोटारसायकल या पेट्रोलवरती चालतात. तर यांनी तयार केलेली मोटारसायकल ही पेट्रोल आणि एलपीजी या दोन्ही इंधनावरती चालते.

आत्तापर्यंत आपण सर्वांनी काही चारचाकी गाड्या या पेट्रोल आणि एलपीजीवरती चालताना पाहिल्या आहेत. पण आम्हाला वाटतं होतं की अशी एखादी मोटारसायकल असावी. आम्ही त्याअनुशंगाने प्रयत्न सुरू केले. अखेर त्या कामात आम्हाला यश आलं असं गाडीची निर्मिती करणा-या विद्यार्थ्यांनी सांगितलं.

ही बाईक तयार करण्यासाठी आम्ही काही वस्तू बाजारात आणल्या, तर काही टाकाऊ वस्तू वापरल्या. त्यातून एलपीजी आणि पेट्रोल अशी मोटारसायकल तयार झाली. देशात सध्या पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून दुचाकी चालवणे सामान्यांना परवड नाही. तसेच पेट्रोलच्या तुलनेत गॅस स्वत: झाला आहे. ही मोटारसायकल तयार करण्यासाठी आम्हाला २२ हजारांचा खर्च आला अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यार्थी जर अशी कामगिरी करणार असतील तर त्यांना संस्था आर्थिक सहकार्य करेल असे आश्वासन  प्राचार्य ए. के. कुरेशी यांनी दिलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News