विद्यार्थ्यांची पूर्णपणे परीक्षा शुल्क माफ करा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 June 2020
  • मराठवडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट विद्यार्थी संघटनेची मागणी

औरंगाबाद : संपूर्ण जगभरात कोरोना (COVID-19) महामारीचे संकट पसरले आहे. त्यामुळे देशात आर्थिक मंदी आली. विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बुडाला. त्यांच्या कुटुंबावर संक्रात आली. अशा संकटात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतला. या निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले. सध्या उन्हाळी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरून घेतले जात आहेत. परीक्षा संबंधीत विद्यापीठाने परीपत्रक जाहीर केले. कोरोनाच्या संकट काळात परीक्षा फी कशी भरायची असा प्रस्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला. त्यामुळे विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क व विलंब शुल्क पूर्णपणे माफ करावी अशी मागणी मराठवडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट विद्यार्थी संघटनेने कुलगुरुंना केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी ग्रामीण भागात राहतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी गरीब, कष्टकरी, शेतकरी व सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. लॉकडाऊन काळात इंटरनेट कॅफे बंद आहेत. त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा फी भरणे शक्य नाही. त्यामुळे विद्यापीठाने सर्व फी माफ करावी असे निवेदन मराठवडा असोसिएशन फॉर स्टुडन्ट विद्यार्थी संघटने अध्यक्ष सादिक शेख यांनी कुलगुरुंना दिले. यावेळी अमित कुटे, सचिन बोराडे, दादाराव कांबळे, पौर्णिमा वाहने, महादेव ढगे, विकास दराडे उपस्थित होते.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News