स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो बनला ‘अन्नदाता’

महेश जगताप
Saturday, 8 June 2019

स्वारगेट -  स्पर्धा परीक्षेतील अपयश, सोबतीला गावाकडील दुष्काळ अशा परिस्थितीशी तो गेली चार वर्षे झगडला. मात्र, यातून आलेल्या नैराश्‍याशी दोन हात करत त्याने खानावळ चालू केली आणि आज तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा ‘अन्नदाता’ बनला आहे. 

स्वारगेट -  स्पर्धा परीक्षेतील अपयश, सोबतीला गावाकडील दुष्काळ अशा परिस्थितीशी तो गेली चार वर्षे झगडला. मात्र, यातून आलेल्या नैराश्‍याशी दोन हात करत त्याने खानावळ चालू केली आणि आज तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा ‘अन्नदाता’ बनला आहे. 

ही कहाणी आहे मंगेश जाधव याची. मंगेश हा मूळचा हिंगोलीमधील औंढा तालुक्‍यातील येंदूरसना या गावचा. तो स्पर्धापरीक्षेत नशीब अजमावण्यासाठी २०१५ मध्ये पुण्यात आला. त्याचे आईवडील शेती करतात. त्याने जवळ जवळ ४ वर्षे पूर्ण वेळ अभ्यास केला; पण अंतिम निकाल कायम थोड्या फरकाने हुलकावणी देत होता; पण खचून न जाता त्याने परीक्षा देत असताना करिअरचा दुसरा मार्ग अवलंबिण्याचे ठरविले आणि त्याने अभ्यासिका सुरू केली. यासाठीचा काही खर्च घरच्यांनी व मित्रांनी उचलला. अभ्यासिकेला चांगला प्रतिसाद मिळू लागताच त्याने हॉटेल व्यवसाय सुरू केला. यातही त्याला यश आले.

अभ्यास करीत असताना विद्यार्थ्यांना कोणत्या समस्याला तोंड द्यावे लागते, याची कल्पना त्याला होती. पुण्यात एका विद्यार्थ्याला प्रतिमहिना ७ ते ८ हजार एवढा खर्च येतो; पण तो खर्च सर्वच विद्यार्थ्यांना पेलतोच असे नाही. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे अजून भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून त्याने दुष्काळी भागातील ६ विद्यार्थ्यांना जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे आणि एक नवा आदर्श निर्माण केला आहे.  

मी बुलडाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील आहे. गावाकडे अत्यंत भीषण परिस्थिती आहे. मंगेशने जेवणाची मदत केल्याने मला पुण्यात राहण्यास खूप मदत झाली. - सागर बोरसे, विद्यार्थी 

अभ्यास करताना मी अनेकदा दोन ते तीन विद्यार्थ्यांना एक डब्यात जेवताना पाहायचो. हे दृश्‍य मला पाहवत नव्हते. त्यामुळे मी शक्‍य तेवढी मदत करण्याचा निर्णय घेतला.  - मंगेश जाधव 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News