विज्ञानाच्या 'अविष्कारातून' विद्यार्थी घडतात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 January 2020

अब्दुल कलामांकडून प्रेरणा घ्या 
शिक्षणाचा खरा उद्देश्‍य विद्यार्थी घडविणे हा आहे. विज्ञानाच्या अविष्कारातून अनेक कर्तृत्वान व्यक्ती घडले. आजची मुले प्रत्यक्ष प्रयोगातून प्रगतीच्या दिशेकडे वाटचाल करतात. विज्ञानातून प्रगतीचा, उत्थानाचा मार्ग निवडतात. विज्ञानाचे प्रयोग चांगले असावे ज्यातून जगाला फायदा व्हावा

अकोला :  देशातील विविध संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला वैज्ञानिकांची आवश्‍यकता आहे आणि ही आवश्‍यता खंडेलवाल ज्ञान मंदिरातील मुले निश्‍चितच भरून काढतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक तथा पद्मश्री डॉ.रविंद्र कोल्हे यांनी येथे केले.

राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर, जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ व खंडेलवाल ज्ञान मंदिर यांच्या संयुक्त विद्यामाने बुधवारपासून तीन दिवसीय गौरक्षण रोड वरील खंडेलवाल ज्ञान मंदिर येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाच्या उद्‌घाटन डॉ.कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोपाल खंडेलवाल हे होते. तर विशेष उपस्थिती म्हणूण राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूरचे संचालक रविंद्र रमतकर, सहाय्यक संचालक तेजराव काळे, खंडेलवाल चारिटेबल ट्रस्टचे ज्ञानप्रकाश मुरलीधर खंडेलवाल, डॉ.पद्मजा अरूण महाजन, सचिव प्रमोदकुमार खंडेलवाल, कोषाध्यक्ष दिलीप तुळशीराम खंडेलवाल, प्राचार्य मुग्धा कळमकर यांच्यासह जिल्ह्यातील इतर शाळांचे प्राचार्य व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी  उपस्थित होते. तीन दिवसीय विज्ञान प्रदर्शनाला खंडेलवाल ज्ञान मंदिर येथे सकाळी ११ वाजता दिप प्रज्वलन करून थाटात सुरुवात झाली.

यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळा व विद्यार्थी हे बहुसंख्येने सहभागी झाले असून विद्यार्थ्यांनी आपले विविध प्रकारचे मॉडेल सादर केले. तसेच माध्यमिकचे शिक्षणधिकारी प्रकाश मुकुंद यांनी डॉ.कोल्हे यांच्या कार्याकडून आज प्रत्येकाने प्रेरणा घेण्याची गरज आहे. तसेच त्यांनी यावेळी डॉ.कोल्हे यांच्या जीवनप्रवासही मुलाखतीच्या माध्यमातून यावेळी उलगडला.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News