अकरावीच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयांकडून होतेय विद्यार्थी-पालकांची लूट 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 August 2020
  • यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जून महिन्यात लागणार दहावीचा निकाल यावर्षी महिनाभर उशीरा लागला. मागील महिन्यात २८ जुलै रोजी ,महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली.

मुंबई : यंदा कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जून महिन्यात लागणार दहावीचा निकाल यावर्षी महिनाभर उशीरा लागला. मागील महिन्यात २८ जुलै रोजी ,महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. अनुदानित महाविद्यालयांसाठी शुल्क रचना ही ठरून दिली जाते. परंतु यावर्षी शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या अर्धवट माहितीमुळे महाविद्यालय विद्यार्थी पालकांकडून बेकायदेशीर शुल्क वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

विद्यार्थी आणि पालकांकडून महाविद्यालयं अभ्यासक्रम तसेच विविध विषयांकरीता सरकारने सांगितलेल्या शुल्कांपेक्षा दहापट अधिक शुल्क आकारत असल्याची तक्रार सिस्कॉम या संस्थेने केली आहे.  सिस्कॉम या संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार शहरातील प्रत्येक अनुदानित महाविद्यालयांचे शुल्क हे वेगवेगळे असून महाविद्यालयं आकारत असलेल्या शुल्कांवर शिक्षण विभागाचे निर्बंध राहिले नाहीत. शिक्षण विभागाने विद्यार्थी आणि पालकांची प्रवेश शुल्काकरीता महाविद्यालयांकडून होणारी लूट थांबविण्यासाठी तसेच शुल्कामध्ये एक समानता आणण्यासाठी सरकारच्या अनुदानित महाविद्यालयांचे शुल्क निश्चित केले होते. परंतु शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आलेले शुल्क महाविद्यालयांच्या माहिती पुस्तकात दिसत नाही. त्यामुळे ज्यादा शुल्क आकारणाऱ्या संस्थान सोबत शासनातील काही लोकांनी हातमिळवणी केल्याचे आरोप सिस्कॉम संस्थेच्या संचालिका वैशाली बाफना यांनी केला आहे.

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ही शासकीय व्यवस्थेमध्ये पारदर्शकता यावी तसेच शाळा, महाविद्यालये, पालक यांचे श्रम आणि पैसे दोन्ही वाचावेत यासाठी करण्यात आली होती. परंतु अनुदानित आणि विनाअनुदानित महाविद्यालय अव्वाच्यासव्वा शुल्क आकारात असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने ठरवून दिलेल्या शुल्काबद्दल विद्यार्थी आणि पालकांना पूर्ण माहिती कधीच दिली जात नाही आणि त्यामुळे पालकांचे यात आर्थिक नुकसानही होत आहे. तेव्हा शिक्षण विभागाने याप्रकरणात लक्ष घालून विद्यार्थी पालकांना दिलासा द्यावा आणि वाढीव शुल्क आकारणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई करावी अशी मागणी सिस्कॉम या संस्थेकडून करण्यात आली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News