अखेर ‘त्या’ विद्यार्थ्यीनीचे आंदोलन मागे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 4 March 2020
  • विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतल्याप्रकरणी प्राचार्य तसेच दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

चांदूररेल्वे : विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतल्याप्रकरणी प्राचार्य तसेच दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याविरोधात विद्यार्थिनींनी सुरू केलेले आंदोलन मंगळवारी मागे घेण्यात आले.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात विद्यार्थिनींनी प्रेमविवाह न करण्याची शपथ घेतली होती. हा विषय संपूर्ण महाराष्ट्रात मागील १० दिवसांपासून गाजत आहे. त्यातूनच संस्थेने प्राचार्य तसेच दोन प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्याच्या विरोधात मुलींनी आंदोलनाला सुरुवात केली. प्राध्यापकांनी आमच्यावर कोणताच दबाव आणला नाही व सध्या ज्या घटना घडत आहेत. त्या अनुषंगाने ही शपथ घेण्यात आल्याचेसुद्धा मुलींनी स्पष्ट केले. मंगळवारी प्राध्यापकांचे निलंबन रद्द करण्याकरिता १० दिवसांचा अल्टिमेट देत हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News