आदिवासी विद्यार्थी गिरवणार संगणकाचे धडे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

पाली : पाच्छापूर ग्रुप ग्रामपंचायतीकडून डुबेवाडी प्राथमिक शाळेला संगणक संचाची भेट देण्यात आली आहे. त्यामुळे येथील आदिवासी विद्यार्थी आता संगणकावर ज्ञानकण 
गिरवणार आहेत.

आजचे युग विज्ञानयुग, स्पर्धेचे युग व संगणक युग आहे. त्यामुळे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचे कार्य आमच्याकडून करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान असणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे मत शाळाप्रमुख संदीप हिंगणे यांनी व्यक्त केले.  

पाच्छापूर ग्रुप ग्रामपंचायतमार्फत पंचक्रोशीतील, ग्रामपंचायतीमध्ये समावेश होणाऱ्या सर्व शाळांना विविध सुविधा पुरवण्यात येतात. शैक्षणिक साहित्य, खेळणी, पुस्तके, संगणक संच शाळांना भेट देण्यात आले आहेत. यामध्ये दर्यागाव, आसानवाडी या दोन शाळांना एकाच वेळी संगणक संच भेट देण्यात आले आहेत. तसेच अंगणवाड्यांना खेळणी, शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक तक्तेही ग्रामपंचायतीमार्फत दिले आहेत.

या वेळी ग्रुप ग्रामपंचायत पाच्छापूर सरपंच संजय हुले, सदस्य राम हुले, चंद्रकांत शिद, ग्रामसेवक राहुल कांबळे, गणेश धनावडे, ग्रामस्थ किसन वालेकर, शाम वालेकर, रोहित जाधव, डुबेवाडीचे शाळाप्रमुख संदीप हिंगणे, शिक्षक राजू बांगारे, शफी सय्यद उपस्थित होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News