विद्यार्थ्यांच्या शाळेची फी संस्थाचलकाने केली माफ; PF काढून मजूरांना दिला मदतीचा हात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 25 July 2020

महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करावे म्हणून विद्यार्थी संघटना, पालक यांनी सरकारकडे विनंती अर्ज केला, मात्र सरकारने यावर कोणतीही भुमीका घेतली नाही. मात्र मालाड येथील खासगी 'झेएल इंग्लिश मीडियम स्कुल'ने स्वत:हून मजूर पालकांच्या मुलांची फी माफ केली आणि सामाजिक दायीत्व जोपासले.   

मुंबई : कोरोना विषाणूने संपुर्ण राज्यात थेमान घातले. दिवसेंदिवस कोरोनाचे थेमान वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशात लॉकडाऊन सुरु केले. त्यामुळे बहुतांश उद्योग, व्यवसाय बंद झाले. उद्योग, व्यवसायात काम करणारे लाखो मजूर बेरोजगार झाले, असा बेरोजगार मजूरांना मिरजा आणि फैज या दाम्पत्यांनी मदतीचा हात दिला. कामगारांच्या मुलांचे शालेय शुल्क माफ करुन समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. महाविद्यालयीन परीक्षा शुल्क माफ करावे म्हणून विद्यार्थी संघटना, पालक यांनी सरकारकडे विनंती अर्ज केला, मात्र सरकारने यावर कोणतीही भुमीका घेतली नाही. मात्र मालाड येथील खासगी 'झेएल इंग्लिश मीडियम स्कुल'ने स्वत:हून मजूर पालकांच्या मुलांची फी माफ केली आणि सामाजिक दायीत्व जोपासले.   

मिगजा आणि फैज या दोघांनी १० वर्षापुर्वी एक छोटी शाळा सुरु केली. 'संध्या पहीली ते दहावी वर्गात ३०० पेक्षा अधिक मुले शिक्षण घेत आहेत. बहुतांश विद्यार्थी मालाड येथील अंबेवाडी झोपडपट्टीतील आहेत. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांचा रोजगार बुडाला. पालकांनी मिरजा आणि फैज यांना फोन करुन मदतीची विनंती केली. त्यातील सर्वांधीक फोन हे मदूराचे होते. काही स्वंयसेवी संस्थांची मदत घेऊन मजूरांना दररोज जेवनाची व्यवस्था केली. मात्र एकिकडे दिवसेंदिवस मदत मागणाऱ्यांची संख्या वाढत होती तर दुसरीकडे अन्न धान्यांची कमतरता जाणवत होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून जमा करुन ठेवलेली पुंजी मजूरांच्या मदतीसाठी वापरली' असे मिगजा यांनी सांगितले

मिरजा यांचे पती एका खासजी कंपनीत काम करतात, त्यानी 'कंपनीतील सहकाऱ्यांकडून काही रक्कम गोळा केली, त्यातून मजूरांना अन्न, धान्याचा पुरवठा केला. तरी देखील मजूर मदतीचे आवाहन करता होतो, शेवटी भविष्या निर्वाह निधीची रक्कम काढून मजूरांना धान्याचे पाकीट पाटप केली. ५ लाख रुपये मजूरांच्या मदतीसाठी काढले होतो त्यापैकी ४ लाख ५० हजार खर्च झाले आहेत' असे फैज खान यांनी सांगितले. गरजवंत मजूरांना मदत करण्याचे आवाहन खान यांनी नागरिकांना केले. 

विद्यार्थ्यांच्या आई- वडीलांचे फोन आले, त्यांनी शाळेची फी भरण्यास नकार दिला. त्यामुळे आम्ही मजूरांच्या मुलांची ३ महिन्याची फी रद्द केली. आम्ही पालकांकडे फी साठी मागणी केली असती तर त्यांनी मुलांना शाळेत पाठवणे बंद केले असते. त्यामुळे मुलांचे शिक्षण थांबले असते. त्यामुळे आम्ही फी माफ करण्याना निर्णय घेतला.
- मिरजा खान, संस्थापक अध्यक्ष, झेएल इंग्लिश मीडियम स्कुल, मलाड

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News