शाहु अभियांत्रिकी मुलाखत : निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 3.60 लाखांचे पॅकेज

अतुल पाटील, औरंगाबाद
Friday, 31 January 2020

मराठवाड्यात इन्फोसिससारखी चांगली कंपनी आली. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. विद्यार्थ्यांनी इंग्रजीत सुधारणा केल्यास आणखी मोठी संधी मिळू शकते.
- डॉ. उल्हास शिंदे, प्राचार्य, छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय, कांचनवाडी.

औरंगाबाद : कांचनवाडीतील छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्फोसिस या बहुराष्ट्रीय कंपनी तर्फे पूल कॅंपस घेण्यात आले. ऑनलाईन चाचणी, मुलाखतीनंतर 133 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक 3 लाख 60 हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे.

इन्फोसिस डिजिटल सेवा देणारी जगातील अग्रगण्य व भारतातील मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मराठवाडा आणि खान्देशसाठी 2008 नंतर पहिल्यांदाच कंपनीतर्फे मुलाखती घेण्यात आल्या. शाहु अभियांत्रिकी महाविद्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्यातर्फे 28 ते 30 जानेवारी दरम्यान पुल कॅंपस पार पडला. औरंगाबादचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, जळगावचे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्याशी संलग्नित महाविद्यालतून विद्यार्थी आले होते.

छत्रपती शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयात 28 आणि 29 जानेवारीला 1360 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन चाचणी दिली. यातून 30 जानेवारीला 191 विद्यार्थ्यांना अंतिम मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन ऍप्टीट्युड, टेक्‍निकल मुलाखती, एच. आर. मुलाखती झाल्या. ऑनलाईन ऍप्टीट्युडमध्ये कॉन्टिटेटिव्ह टेस्ट, रिझनिंग टेस्ट, व्हर्बल ऍबिलिटी टेस्ट झाली.

इन्फोसिसतर्फे अंतिम 133 विद्यार्थ्यांची सिस्टीम इंजिनिअर म्हणून निवड करण्यात आली आहे. याबाबतचे ई मेल विद्यार्थ्यांना करण्यात आले आहेत. नियुक्‍ती पत्र लवकरच मिळणार आहे. अंतिम निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांना 3 लाख 60 हजार रुपयांचे वार्षिक वेतन मिळणार आहे. कंपनीतर्फे एच.आर. विभागाचे अनिवेश जोशी, केदार कुलकर्णी, नितीन परदेशी आदींची उपस्थिती होती.

शाहु अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्मिता खराद, स्नेहल दिघे, अक्षय गवळी, विशाल बारगळ, सुरज रामरख्या आदी विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष रणजीत मुळे, सचिव पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य डॉ. उल्हास शिंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुल कॅंपससाठी टीपीओ प्रा. दीपक पवार, डॉ. गिरीश काळे यांनी पुढाकार घेतला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News