सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारे तरुण, देशाचे भवितव्य कसे काय?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 11 January 2020

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ काही विद्यार्थी संघटनांनी ‘महाविद्यालय बंद’ची हाक दिली. दरम्यान अनेक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या त्याचसंदर्भात  SND कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, येवला येथील सागर वाघ यांनी या हल्ल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या विद्यार्थ्यांचे नाही, पण विद्यार्थी संघटनांचे जे कोणी प्रमुख आहेत, त्यांची  मते मात्र राजकीय धोरणांशी मिळती जुळती आहेत. तरूणांनी आधी आपले भवितव्य घडवले पाहीजे, नंतर राजकारणाची भाषा केली पाहिजे, त्यामुळे महाविद्यालयीन तरूणांनी राजकारणात सहभागी होण्यासाठी एखादा काळ ठरवावा. सध्या स्वार्थ साधण्यासाठी राजकीय पक्ष विद्यार्थ्यांचा उपयोग करत आहेत, हे आता उघडपणे दिसत आहे. काही विद्यार्थी संघटना ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत आहे, पण काही संघटना या राजकीय पक्षाशी जोडल्या आहेत. हे नक्की. भविष्यात एखादी विशिष्ट राजकीय भूमिका घेऊन व्यक्त होण्यासाठी मी तयार असेन. जेएनयूसारख्या ठिकाणी पोलिसांना जाण्यास बंदी आहे, त्या ठिकाणी हे गुंड लोक गेलेच कसे काय, हा प्रश्न पहिला पडतो. सध्या पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत, विद्यार्थी संघटना कुठे तरी त्याला हिंसक वळण लावतायत, सार्वजनीक मालमत्तेच नुकसान करत आहेत, हे विद्यार्थी कसे काय देश घडवतील, असा प्रश्न मात्र कायम आहे. 
सागर वाघ, SND कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, येवला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News