विष प्राशन करून विद्यार्थिनीची आत्महत्या

निखिल ठाकरे
Thursday, 30 July 2020

 काल  निकाल लागलेल्या दहावीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीने काल विष घेऊन आत्म्यहत्या केल्याची घटना जवळच्या सावली (वाघ) येथे घडली.

हिंगणघाट :- काल  निकाल लागलेल्या दहावीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्याने एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीने काल विष घेऊन आत्म्यहत्या केल्याची घटना जवळच्या सावली (वाघ) येथे घडली. कु शिवानी वासुदेव डुकरे असे या विद्यार्थिनीचे नाव असून नुकत्याच मार्च २० मधे तीने दहाव्या वर्गाची नागपुरबोर्डाची परीक्षा दिली. 

काल दि २९ रोजी शिवनीचे परिक्षेचा निकाल लागला,त्यात तीला कमी मार्क्स मिळाल्याने निराश होऊन घरिच विषप्राशन केले.तीचे कुटुंबियांचे लक्षात येताच कु.शिवानीला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.हिंगणघाट पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय,हिंगणघाट येथे करण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलिस नायक महेंद्र आकरे,पोशी घनश्याम मडावी करीत असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News