भोजच्या विद्यार्थ्यांचा रॉयल झेंडा ; तीन दिवस तज्ज्ञांकडून कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा यिनबझ
Friday, 6 March 2020

राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी अशा दोन विद्यार्थ्यांची निवड या कॅम्पसाठी होते.

मांगूर : रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री (यूके) आणि जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर येथे सालटर्स केमिस्ट्री या राष्ट्रीय स्तरावरील कॅम्पचे आयोजन केले आहे. लठ्ठे शिक्षण संस्थेच्या भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे समन्वयक डॉ. पी. एस. कंदगल यांनी दोन विद्यार्थ्यांच्या निवडीचा ई-मेल पाठवून अभ्यास दौऱ्यासाठी निमंत्रण दिले आहे. कर्नाटक राज्यातून प्रत्येक जिल्ह्यातून एका शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी अशा दोन विद्यार्थ्यांची निवड या कॅम्पसाठी होते.

त्यामध्ये भोज हायस्कूलच्या नववीमध्ये शिकणाऱ्या तेजस्विनी संजय माळी आणि आशीष श्रीधर कमते या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यापूर्वी भोज हायस्कूलचे विज्ञान शिक्षक डी. एस. शेवाळे यांनी असे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थी तीन दिवसांत होणाऱ्या विविध सत्रांत प्रयोगशाळेतील सुरक्षितता, उपकरणांची ओळख, कलर क्रिएशन, क्रिस्टलायजेशन, फॉरेन्सिक चॅलेंज, स्लाईम कॅम्पस व्हिजिट टूर, केमिस्ट्री एक्‍सपो, क्‍लॉक रिॲक्‍शन, हायड्रोजेल इन्व्हेस्टिीगेशन, सायन्स टॉईज ॲक्‍टिविटीचा अभ्यास करणार आहेत. त्यासाठी विविध शास्त्रज्ञ व तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे.

या अभ्यास दौऱ्यासाठी चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याचे उपसंचालक गजानन मण्णीकेरी, ‘डायट’चे प्राचार्य मोहन जिरगीहाळ, विषय पर्यवेक्षक यू. ए. मुल्ला, निपाणीच्या गटशिक्षणाधिकारी रेवती मठद, क्रीडा गटशिक्षणाधिकारी व्ही. के. सनमुरी, हायस्कूलचे चेअरमन संदीप पाटील, मुख्याध्यापक एस. व्ही. केसरकर, विज्ञान शिक्षक एस. टी. कुंभार, एस. एस. चौगुले यांचे मार्गदर्शन लाभले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News