कुटुंब चालवण्यासाठी विद्यार्थीनी बनली दुचाकी मॅकेनिक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 12 September 2020

कुटुंब चालवण्यासाठी विद्यार्थीनी बनली दुचाकी मॅकेनिक

कुटुंब चालवण्यासाठी विद्यार्थीनी बनली दुचाकी मॅकेनिक

कोल्हापूर - कधी कोणाला कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष कारावा लागेल हे निश्चित नसतं, तसंच ही वेळ आयुष्यात कधी येईल हेही निश्चित नसतं. कोल्हापुरातील एका विद्यार्थीने वडिलांची दृष्टी गेल्यानंतर घरचं दुचाकी दुरूस्तीचं गॅरेज सुरू ठेवून कुटुंब चालवलं आहे. त्यामुळे कुटुंबाला मोठा आधार झाला असून परिसरात तीचं कौतुक केलं जात आहे. त्या विद्यार्थीनीचं नाव पूजा गाडेकर असं असून ती बी. ए. च्या दुस-या वर्गात शिकते. गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे वडिलांचं गॅरेज आहे.

सध्या कोल्हापूरात असलेल्या पुजाचं मुळं गाव लिंगनूर, पुर्वी वडिल दुचाकी दुरूस्तीच्या कामानिमित्त कणेरी परिसरात राहायला आले आणि तिथेचं स्थाईक झाले. जवळच्या एमआयडीच्या रस्त्यावर ते छोट्याशा टपरीत त्यांनी दुचाकी दुरूस्तीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. तिथं त्यांच्या धंद्याचा जम बसला त्यामुळे स्थाईक झाले. पण त्यांना मधुमेहाचा अधिक त्रास झाल्याने त्यांची दृष्टी कमजोर झाली.

पुजाच्या वडिलांचं आजारपणात अधिक पैसे खर्च झाले. तसेच चारीबाजूनी पैशाची अडचण व्हायला लागली. पण पूजाने घरातील अर्थिक कोंडी विचारात घेऊन कुटुंबाचा अर्थिक आधार बनण्याचा विचार केला. बारावीची परीक्षा झाल्यानंतर तिने थेट आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये यायला सुरूवात केली. तिथं जाऊन तिनं गाड्या दुरूस्त करण्याचा निर्णय घेतला. गाड्या दुरूस्तीचं काम जमू लागल्याने तीने पुढचं शिक्षण सुरू ठेवलं.

वडिलांचा पुर्वी अपघातात एक पाय निकामी झाला होता. त्यातचं त्यांना मधुमेहाच्या आजाराने गाठलं त्यामुळे कुटुंबावरती उपासमारीची वेळ आली होती. परंतु पुजाच्या जिद्दीने आणि चिकाटीने त्यावर मात केली. तिने मोटारसायकल दुरूस्तीच्या कामात आता चांगला जम बसवला असून त्यातून ती चांगले पैसे सुध्दा कमावत आहे.

पूजा मुळात हुशार असल्याने तिला हे काम पटकन जमलं. पूजा सर्वात मोठी असल्याने तीने ही जबाबदारी अंगावर घेतली आहे. ग्राहकांचा सुध्दा चांगला प्रतिसाद आहे. मी रोज तिच्यासोबत गॅरेजमध्ये येतो. - बाळासाहेब गाडेकर वडिल

वडिलांची दृष्टी गेल्यानंतर कुटुंब अर्थिक अडचणीत सापडले होते. त्याला बाहेर कसं काढावं असा विचार सतत डोक्यात येतं होता. परंतु घरचा व्यवसाय पुढे नेण्याचा विचार केला आणि त्यात मी यशस्वी ठरले. - पूजा गाडेकर

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News