यश प्राप्तीसाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 17 January 2020

जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. परिस्थितीवर मात करून संघर्ष करण्याची जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठणे शक्‍य होते.

मालेगाव कॅम्प : जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीचा बाऊ करू नका. परिस्थितीवर मात करून संघर्ष करण्याची जिद्द व चिकाटीने यशाचे शिखर गाठणे शक्‍य होते, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय अंध उद्योजक डॉ. भावेश भाटिया यांनी केले. शिर्डी येथे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्‍ट कॉन्फरन्समध्ये संवाद साधताना ते रविवारी बोलत होते.

डिस्ट्रिक्‍ट गव्हर्नर राजेंद्र भामरे, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सलीम रेझा, माजी प्रांतपाल राजीव शर्मा, प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सतीश गुप्ता, मधुसूदन काबरा, डॉ. दिलीप भावसार, डॉ. महेश तेलरांधे, श्‍याम अमृतकर, दीपक मोदी, विजय पोफळे, निखिल दशपुते, 
राजेंद्र देवरे, प्रवीण वाणी आदी उपस्थित होते. डॉ. भाटिया यांनी लोटगाडीवरून मेणबत्ती विक्री व्यवसायाची वाटचाल आपल्या शब्दात व्यक्त केली.

आठ वेळा डॉक्‍टरेट असलेल्या भाटिया यांच्या ‘सनराइज कॅंडल’च्या उत्पादनातून हजारो हातांना रोजगार दिला. केंद्र सरकारतर्फे ते तीन वेळा राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. या वेळी रोटरीच्या गायन स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके दिले. समारोपानिमित्त विदेशातील रोटरॅक्‍ट यांच्या विविध कलाकृतींचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. कॉन्फरन्स उपाध्यक्ष राजन धारणकर यांनी प्रास्ताविक केले. सीमा पच्छाडे व सतीश कलंत्री यांनी सूत्रसंचालन केले.

कॉन्फरन्ससाठी राजू सहगल, पराग पाटोदकर, ममता कुलकर्णी, पूजा खत्री, राजेंद्र जाधव, केशव खैरनार, राजेंद्र देशमुख, राजेंद्र दिघे, गुरुदास गावडे, प्रशांत कुलकर्णी, आकाश भामरे, शिवनारायण काकाणी, उदय राहुडे, राजेंद्र अहिरे, श्रीनिवास कलंत्री, यशवंत चौधरी, सतीश बच्छाव, विनायक पाटील, संदीप पगार, निंबा पगार, 
सुमित बच्छाव, डॉ. अनिल सावळे, देवेंद्र अलई यांनी 
पुढाकार घेतला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News