ताण- तणापासून मिळवा मुक्ती; वाढवा कार्यशक्ती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 9 November 2019
  • ताण- तणावापासून दूर राहण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे.
  • आठवड्यातून कमीत कमी ४ तास व्यायाम केल्यामुळे ताण तणाव दोन वर्षांपर्यंत कमी होऊ शकतो हे एका संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे

धकाधकीच्या जिवनात कामाचा प्रचंड ताण कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. तसेच महिलांना घरातील काम सांभाळून नोकरी सांभाळावी लागते. त्यामुळे महिला आणि पुरुष दोघेही डिप्रेशनमध्ये जातात. शिक्षण, करिअर, नोकरीच्या शोधात तरुणाई सतत स्ट्रेसमध्ये असते. यामुळे मानसिक आणि भावनिक आरोग्य धोक्यात येते. 

ताण- तणावापासून दूर राहण्यासाठी व्यायाम हा सर्वोत्तम मार्ग आहे. आठवड्यातून कमीत कमी ४ तास व्यायाम केल्यामुळे ताण तणाव दोन वर्षांपर्यंत कमी होऊ शकतो हे एका संशोधनामधून हे सिद्ध झाले आहे. ज्यांना नैसर्गिक डिप्रेशनची समस्या आहे त्यांनाही फायदा मिळू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये डिप्रेशनची जेनेटिक लक्षणे असतील तर हे लोक नियमितपणे एक्सरसाइज करूनही स्वत:ला डिप्रेशनपासून वाचवू शकतात. 

या रिसर्चच्या मुख्य आणि मॅसाच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील पोस्टडॉक्टरल फेलो कर्मेल चोई यांनी सांगितले की, 'आमच्या रिसर्चच्या निष्कर्षातून ही बाब पूर्णपणे समोर आली आहे की, जेव्हा डिप्रेशनचा विषय येतो तेव्हा हे लोक नियमितपणे एक्सरसाइज करून डिप्रेशनला स्वत:पासून दूर ठेवू शकतात'.

दरम्यान याआधी अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की, स्ट्रेसमुळे तुम्हाला डिप्रेशनची समस्या होऊ शकते. त्यामुळे स्ट्रेस फ्री जगायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने करा. सकाळी लवकर उठा. मोकळ्या वातावरणात जाऊन मूड फ्रेश करा. आरोग्यासाठी व्यायाम आणि नाश्ता महत्त्वाचा असल्याने तो वेळेत करा. सकाळी उठल्या उठल्या कामाचा ताण घेऊ नका. चांगली गाणी ऐका यामुळे शरिरात उत्साह येईल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News