मुंबईच्या रस्त्यावर पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत पकडलं, मग...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 13 July 2020

कोरोनाच्या काळात मुंबईत कमी प्रमाणात लोकांची वर्दळ पाहायला मिळते, तसेच अनेकजण कोरोनाच्या भीतीने घराबाहेर जाण टाळत आहेत. अशातच काल मुंबईच्या पेडर रस्त्यावर पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये पकडलं आणि रस्त्यावर राडा सुरू झाला.

मुंबई - कोरोनाच्या काळात मुंबईत कमी प्रमाणात लोकांची वर्दळ पाहायला मिळते, तसेच अनेकजण कोरोनाच्या भीतीने घराबाहेर जाण टाळत आहेत. अशातच काल मुंबईच्या पेडर रस्त्यावर पत्नीने पतीला गर्लफ्रेंडसोबत कारमध्ये पकडलं आणि रस्त्यावर राडा सुरू झाला. पतीला दुस-या महिलेसोबत पाहिल्यानंतर पत्नीने गाडी अडवून प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे रस्त्यात दूरपर्यंत रांगा लावल्या होत्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

पती गर्लफ्रेंडसोबत बाहेर निघाल्याचं समजताच, पत्नीने पतीच्या गाडीचा पाठलाग करायला सुरूवात केली. पाठलाग सुरू असताना पेंडर रोडच्या सिग्नलला पत्नीने पतीची गाडी अडवली. तात्काळ चिडलेल्या पत्नीने बाहेरून गाडीवर मारायला सुरूवात केली. त्याचबरोबर पत्नीने बाहेरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा लॉक केल्यामुळे उघडता आला नाही. त्यानंतर तिथं अधिक ट्रॅफिक जमा व्हायला सुरूवात झाली. 

ही घटना नुकतीच मुंबईत घडली आहे, ट्रॅफिक अधिक होत असल्याने तिथे बंदोबस्तावर असलेले पोलिस जमा झाले, त्यांनी परिसरातलं ट्रॅफिक हटवलं. तोपर्यंत पत्नी गाडीच्या बोनेटवरती जाऊन बसली होती. जोरजोरात ओरडत असल्यामुळे आजू-बाजूला सुध्दा लोक जमा झाल्याचे व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. पोलिसांनी ज्यावेळी पतीला बाहेर काढलं, तेव्हा पत्नीने पतीला मारहाण सुध्दा केली. 

त्यानंतर दोन्ही गाड्या बंदोबस्तावर असलेले पोलिस गावदेवी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. पण दोन्हीकडून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास नकार दिला. मग पोलिसांनी रस्त्यात गोंधळ घातला, आणि गाड्याची अडवणूक केली म्हणून तिघांकडून दंड आकारला. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News