'स्ट्रीट डान्सर ३D' Vs 'पंगा'; पाहा कोणी केली किती कमाई ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 27 January 2020
  • अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच शुक्रवारी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असणारा 'स्ट्रीट डान्सर ३डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबरच कंगना रणावतच्या 'पंगा'  या चित्रपटाने पडद्यावर एन्ट्री केली.

मुंबई : अभिनेता अजय देवगणचा तान्हाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असतानाच शुक्रवारी वरूण धवन आणि श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असणारा 'स्ट्रीट डान्सर ३डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबरोबरच कंगना रणावतच्या 'पंगा'  या चित्रपटाने पडद्यावर एन्ट्री केली. परंतु  'स्ट्रीट डान्सर ३डी' आणि पंगा या दोन्ही चित्रपटाच्या शर्यतीत 'पंगा' मागे पडल्याचे दिसून येत आहे. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील कमाई  पाहता अभिनेत्री कंगना रणावत आणि अश्विनी तिवारी अशी  दमदार जोडी असूनही त्याचा  फारसा प्रभाव प्रेक्षकांवर पडला नसल्याचे समजून येते. 

ABCD २ च्या यशांनंतर रेमो डिसुझा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर ३डी' हा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमविण्यास सुरुवात केली आहे.  प्रजासत्ताकदिनी  या चित्रपटाने १७.७६ कोटी इतकी कमाई केली असून आधीच्या दोन दिवसाचे एकंदरीत कलेक्शन पाहता चित्रपटाने एकूण ४१.२३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच आठवड्यातील दोन दिवसांच्या सुट्टीचा चांगला प्रभाव चित्रपटाच्या कमाईवर झाल्याचे चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सांगितले. 

हेही वाचा: पाहा! दीपिकाने रणवीरकडे केली 'ही' अनोखी मागणी https://www.yinbuzz.com/look-deepika-made-unique-request-ranveer-23795

याउलट कंगनाच्या 'पंगा' चित्रपटाला तुलनेने अपयश आले आहे. चित्रपट रिलीझ झाल्यांनतर रविवारी म्हणजेच सुट्टीच्या दिवशीही या चित्रपटाने  ६.६० कोटी एवढीच कमाई केली असून प्रदर्शनानंतर ३-४ दिवसांनंतरही या चित्रपटाची कमाई ही अपेक्षेपेक्षा कमीच म्हणजे केवळ १४.९२ इतकीच झाली. थोडक्यात आठवड्यातील सुट्टीचा फायदा पंगा या चित्रपटाला मिळाला नसल्याचे स्पष्ट होते. 

 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News