'स्ट्रीट डान्सर 3 डी'ची कंगना राणावतच्या 'पंगा'ला मागे टाकत 50 कोटीची कमाई   

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Thursday, 30 January 2020
  • शुक्रवार 24 जानेवारी रोजी कंगना राणावत यांचा पंगा आणि वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचा 'स्ट्रीट डान्सर 3 डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
  • दोन्ही चित्रपटांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

शुक्रवार 24 जानेवारी रोजी कंगना राणावत यांचा पंगा आणि वरुण धवन आणि श्रद्धा कपूरचा 'स्ट्रीट डान्सर 3 डी' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दोन्ही चित्रपटांना समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पण बॉक्स ऑफिसवर 'स्ट्रीट डान्सर 3 डी' दिवसेंदिवस उत्कृष्ट कमाई करत आहे, तर पंगा या चित्रपटाने कमाईत सातत्याने घट नोंदविली आहे. 'स्ट्रीट डांसर 3 डी' चित्रपटाने 6 व्या दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे, तर 'पंगा' आतापर्यंत केवळ 19.83 मिळवू शकली आहे. 

चित्रपटाचे विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, पंगा या चित्रपटाने शुक्रवारी 2.70 कोटी, शनिवारी 5.61 कोटी, रविवारी 6.60 कोटी, सोमवारी 1.65 कोटी, सोमवारी 1 कोटी आणि बुधवारी 1.62 कोटी कमावले आहेत. त्यानुसार चित्रपटाची एकूण कमाई 19.83 कोटी होती.

 

तरन आदर्शच्या ट्विटनुसार, 'स्ट्रीट डान्सर 3 डी' ने शुक्रवारी 10.26 कोटी, शनिवारी 13.21 कोटी, रविवारी 17.76 कोटी, सोमवारी 4.65, मंगळवारी 3.88 कोटी, बुधवारी 3.5 कोटी कमावले. एकूणच या चित्रपटाने भारतात 53.34 कोटींची कमाई केली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News