स्टोरी एका मैत्रीची...

सरिता व्यवहारे, सातारा
Sunday, 4 August 2019

शाळेच्या पहिल्या दिवशी 
आईचा हात सोडून 
ज्यांचा हात धरला हातात 
ते माझे मित्रमैत्रिणी खास 
आजही आहे
आमची मैत्री झकास 
आजही आठवते 
खाल्लेल्या चिंचा,बोरं,
कैञ्या नि पेरू
भातुकली,लपाछपी,लगोरीचा खेळ आमचा रोजच सुरू 
रविवारी असे शाळेला सुट्टी 
आमची आम्हीच घ्यायचो मग अभ्यासाला बुट्टी 
एकाच वयाचे आम्ही सवंगडी 
एकत्रच झालो मोठे 
आता मोठेपणी भेटण्यासही वेळ मिळेना कोठे ...।।१।।

शाळेच्या पहिल्या दिवशी 
आईचा हात सोडून 
ज्यांचा हात धरला हातात 
ते माझे मित्रमैत्रिणी खास 
आजही आहे
आमची मैत्री झकास 
आजही आठवते 
खाल्लेल्या चिंचा,बोरं,
कैञ्या नि पेरू
भातुकली,लपाछपी,लगोरीचा खेळ आमचा रोजच सुरू 
रविवारी असे शाळेला सुट्टी 
आमची आम्हीच घ्यायचो मग अभ्यासाला बुट्टी 
एकाच वयाचे आम्ही सवंगडी 
एकत्रच झालो मोठे 
आता मोठेपणी भेटण्यासही वेळ मिळेना कोठे ...।।१।।

शाळा सुटली, सुरू झाले कॉलेज 
मोरपंखी दिवस आठवतात आज 
फ्रेंडशिप बँड, मेसेजेस, स्लॅमबुक,वेलकम पार्टी,फनी डे ची वेगळीच क्रेझ 
लाईक, शेअर करायचो आम्ही फेसबुक पेज 
नव्याच्या नवलाईची संपली फ्रेज 
मग मात्र जमला आमचा
 'षटकोनी ग्रुप' 
वर्षातून एकदा तरी काढायचो आम्ही 'ट्रिप'
भटकायचो इतके की लागायचही नाही आम्हाला  'गुगल मॅप '
जवळीक एवढी की नावालाही नव्हतं 'व्हॉट्स अप '
 उद्या कोणता ड्रेस घालायचा 
हे आजच ठरवायचो 
आणि बऱ्याचदा करायचो 'मॅचिंग'
कॉलेज मध्ये दिवसभर एकत्र असुनही करायचो आम्ही रात्री मोबाईलवर 'चॅटिंग'
बऱ्याचदा करायचो आम्ही लेक्चर्स बंक नि मारायचो
गप्पा ' विथ चाय कटींग '
तशी जमलीच नाही कधी 
आम्हाला कुणाची लावून द्यायची 'सेटिंग '
प्रोजेक्ट सबमिशन नि रिजल्ट 
त्यातूनही करायचो 
आम्ही सेलिब्रेशन 
कॉलेज कट्टा 
तोही होताच मैत्रीचा आमच्या अनोखा टप्पा 
आजही राखून ठेवलाय ह्रदयात त्याच्यासाठी खास कप्पा ।।२।।

संपलं कॉलेज,सुरु झाली 
वेगळीच स्पर्धा
कामाच्या व्यापात दिवस जाई अर्धा
कसलं चॅटिंग आणि कसला 
चाय कटींग 
गुड मॉर्निंग चा मेसेज
करायला वेळ मिळेना साधा 
त्यातच काहींची झाली लग्न 
जो तो आपापल्या संसारात मग्न 
वेळ मिळेल तेव्हा होतो,
आमचा फोन 
पण तरीही येतोच आडवा
संसाराचा काटकोन त्रिकोण 
व्हॉट्स अप मेसेज अँड स्टेटस यातच बसलोय खरं तर अडकून 
पण यातूनच आम्ही ठेवलाय 
आमच्या मैत्रीचा धागा जपून।३।।

फेसबुक,ट्विटरवर झडू लागल्यात मैत्रीच्या पोस्ट 
सोशल मीडियाच्या 
आभासी मैत्रीत 
हरवलीय खऱ्या मैत्रीची गोष्ट 
होईल हेही लवकरच स्पष्ट 
आणि दिसतील गळ्यात गळे घालून जाताना जिगरी दोस्त।।४।|

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News