‘अनन्या’ ही कथा चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 3 January 2020

या नाटकाला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ही कथा चित्रपटामधून सिनेरसिकांच्या समोर येणार आहे. नव्या वर्षात ‘अनन्या’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, टीझर पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे.

मराठी रंगभूमीवरील दर्जेदार नाटकांमध्ये ‘अनन्या’ या नाटकाचाही समावेश आहे. या नाटकाला आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता ही कथा चित्रपटामधून सिनेरसिकांच्या समोर येणार आहे.

नव्या वर्षात ‘अनन्या’ या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून, टीझर पोस्टरही प्रदर्शित करण्यात आले आहे. प्रताप फड लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ड्रीमव्हिव्हर एंटरटेन्मेंट, ध्रुव दास आणि रवी जाधव यांनी पेलली आहे.

छोट्या पडद्यावरचा ग्लॅमरस चेहरा म्हणजे अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्येही हृता निळ्या शुभ्र आकाशाकडे पाहत उंच भरारी घेताना दिसत आहे.

चित्रपटाच्या या पोस्टरकडे पाहून स्त्रियांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा चित्रपट आहे, असे दिसते. मालिका, नाटकांमधून काम करत प्रेक्षकांना आपलंसं करणारी हृता आता नवी भूमिका घेऊन सज्ज झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News