पोट साफ न होणे विविध समस्यांचे कारण; ५ घरगुती उपाय करा, आजार टाळा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 August 2020

पोट साफ झाले नाही तर पोटदुखी, पोट गुब्बार धरणे, ऍसिडिटी, गॅस भरणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. या सर्व आजारांवर आम्ही काही घरेलू उपाय सांगणार आहोत, घरात असणाऱ्या पाच गोष्टी केल्या तर पोट साफ होईल आणि आजारांपासून मुक्ती मिळेल

मुंबई : अपचन, पोट साफ न होणे यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. या समस्या दुर करण्यासाठी पोट साफ होणे महत्त्वाचे आहे. पोट साफ झाले नाही तर पोटदुखी, पोट गुब्बार धरणे, ऍसिडिटी, गॅस भरणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, त्यामुळे अनेक आजार उद्भवतात. या सर्व आजारांवर आम्ही काही घरेलू उपाय सांगणार आहोत, घरात असणाऱ्या पाच गोष्टी केल्या तर पोट साफ होईल आणि आजारांपासून मुक्ती मिळेल. दिवसभर एका जागी बसून अनेक व्यक्ती काम करतात, त्यामुळे पोटात गॅस होतो, यातून चिडचिडेपणा, अपचन डोक्याचा त्रास अशा अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फक्त पाच गोष्टी कराव्या लागणार आहेत त्या पुढील प्रमाणे:

जिरे आणि ओवा यांचे ज्युस: 

जिरे आणि ओवा यांचे मिश्रण करून सकाळ- संध्याकाळ दोन वेळा प्यावे, त्यामुळे पोट साफ होते आणि ऍसिडिटी पासून बचाव होतो. या मिश्रणामुळे मेटाबोलिक वाढते, वजनही कमी होते. सकाळी ब्रश केल्यानंतर जिरे आणि गोव्याचे पाणी पिल्यास आराम मिळतो. मात्र हे मिश्रण दरोरज घ्यावे लागते. 

चिंच: 

चिंच म्हटल की गोड आणि आंबट ही चव अनेकांच्या तोंडाला पाणी सोडते. चिंच खाल्ल्यामुळे पोटाचे विकास कमी होतात. चिंच आणि  गुळ यांचे मिश्रण करुन किंला चिंचेची चटणी बनवून खाऊ शकता, त्यामुळे पोट साफ होते. आजारांपासून सुटका मिळते. चिंच इतर विविध आजारांवर उपयोगी आहे.

ओवा आणि त्रिफळा 

ओळा आणि त्रिफळा आयुर्वेदिक जडीबुटी म्हणून अनेक काळापासून ओळखल्या जातात. त्रिफळा आणि ओळा यांच्या मिश्रणात शेंडी मीठ घालून त्यांचं चूर्ण बनवावे, हे चूर्ण कोमट पाण्यात टाकून रोज सकाळी घ्यावे. त्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि पचन क्षणता वाढते. त्यामुळे मलनिस्चारण सुरळीत होते.

केळी 

अपचनावर केळी हा रामबाण उपाय आहे, केळी हे फळ पचनक्षमता वाढवण्याच काम करते. केळीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आणि विटामीन बी व ई असते. दिवसातून दोन वेळा जेवणामध्ये केळीचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे केळी ही पूर्ण पिकलेली असावी. कच्ची केळी खाल्यांमुळे पोटाची समस्या अधिक वाढू शकतात. त्यासाठी पुर्ण पिकलेल्या केळीचे सेवन करावे, त्यामुळे पोट साफ होते. 

सफरचंद 

सफरचंदामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मलनिस्सारण प्रक्रिया साफ होते. त्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे गरजेचे आहे. त्यामुळे पोट साफ होण्यास मोठी मदत होते. या घरगुती उपायांमुळे पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळेल. या फळामध्ये कोणतेही केमीकल युक्त घटक नसल्यामुळे साइड इफेक्ट होत नाही.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News