9 करोड पगार असूनदेखील कँटिनमधलं सँडविच चोरलं, म्हणून कामावरून काढलं...

यिनबझ टीम
Thursday, 6 February 2020

ज्याच्या वार्षिक पगार 9 करोड 20 लाख (म्हणजेच महिना 76 लाखांहून अधिक) इतका आहे तो व्यक्ती त्याच्या ऑफिसमधून सँडविच चोरु शकतो, अशी कल्पना करणेही कठिण जातं, मात्र अस वास्तविक घडलं आहे. 

ज्याच्या वार्षिक पगार 9 करोड 20 लाख (म्हणजेच महिना 76 लाखांहून अधिक) इतका आहे तो व्यक्ती त्याच्या ऑफिसमधून सँडविच चोरु शकतो, अशी कल्पना करणेही कठिण जातं, मात्र अस वास्तविक घडलं आहे. 

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये असलेल्या सिटी ग्रुपच्या बँकिंग कंपनीने तिथे काम करत असलेल्या पारस शहा विरोधात कारवाई केली आहे. परंतु, पारसने कॅन्टीनमधून केव्हा आणि किती वेळा सँडविचची चोरी केली आहे हे समजू शकले नाही. मात्र, त्याला त्या कंपनीमधून निलंबित करण्यात आले आहे. पारसच्या भावाने पोलिसांमध्ये दिलेल्या माहितीनुसार पारसला चीज सँडविच खूप आवडतात, तो त्याच्यासाठी काहीही करू शकतो, तो घरीही स्वत: असे सँडविच बनवून खात असतो.

पारस हा युरोपमधील सर्वात मोठा क्रेडिट व्यापाऱ्यांपैकी एक आहे. सिटीबँकमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून तो काम करत होता. समोर आलेल्या माहितीनुसार बँकेतल्या या पदावर अधिकाऱ्यांना 1 दशलक्ष पौंड म्हणजेच सुमारे 9 कोटी रुपये वार्षिक पगार असतो. पारसच्या सोशल मीडिया प्रोफाइलनुसार त्याला बँक सुरक्षा, व्यापार आणि जोखीम व्यवस्थापनाचा अनुभव आहे. त्याने 7 वर्ष एचएसबीमध्येही काम केले आहे. त्याने 2017 पासून सिटी बँकेमध्ये काम करत होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News