#CORONAEFFECT इटलीमधील सर्व स्पर्धांना ३ एप्रिलपर्यंत स्थगिती

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 15 March 2020

रोम : कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या चीननंतर क्रीडा स्पर्धा होत असलेल्या इटलीने या विषाणूचा पदुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘सिरी ए’ या फुटबॉल लीगसह देशातील सर्व क्रीडा स्पर्धा ३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय पंतप्रधान जिस्पी काँटे यांनी जाहीर केला आहे.

रोम : कोरोना विषाणूचा फटका बसलेल्या चीननंतर क्रीडा स्पर्धा होत असलेल्या इटलीने या विषाणूचा पदुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. ‘सिरी ए’ या फुटबॉल लीगसह देशातील सर्व क्रीडा स्पर्धा ३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय पंतप्रधान जिस्पी काँटे यांनी जाहीर केला आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोमुळे ‘सिरी ए’ फुटबॉल लीगकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. सर्व क्रीडा स्पर्धा तहकूब करण्याच्या इटली सरकारच्या निर्णयाअगोदर सिरी ए लीगमधील काही सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. सोमवारी सासोलो आणि ब्रेसिया यांच्यातील झालेला सामना अखेरचा ठरला आहे.

दूरचित्रवाणीवरून लोकांशी संवात साधताना काँटे यांनी क्रीडा सामन्यांबाबतचा हा निर्णय जाहीर केला. अत्यावश्‍यक नसलेला प्रवास, लोकांनी एकत्र येणे यावरचेही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. इटलीत कोरोनामुळे आतापर्यंत ४६३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शाळा, कॉलेजही बंद करण्यात आली आहेत. अशा परिस्थितीत खेळाच्या घडामोडी होणे शक्‍य नाही. फुटबॉल लीगबाबत मलाही दुःख होत आहे, पण लोकांची सुरक्षा आणि प्रकृती महत्त्वाची आहे. कोणत्याही परिस्थितीत या विषाणूचा अधिक फैलाव रोखणे गरजेचे आहे, असे काँटे यांनी सांगितले.

‘सिरी ए’ कशी पूर्ण करणार?
तत्पूर्वी सोमवारी इटलीच्या राष्ट्रीय ऑलिंपिक समितीची बैठक झाली आणि त्यांनी देशातील सर्व सामने ३ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात येण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे दिला होता. त्यांच्या या प्रस्तावावर विचार करून देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय इटली सरकारने घेतला. ‘सिरी ए’ लीगमधील यंदाच्या मोसमातील ३८ पैकी २६ सामनेच झालेले आहेत.

ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या युव्हेंटस संघाने लाझिओवर एका गुणाची आघाडी घेतलेली आहे. त्यानंतर इंटर मिलान तिसऱ्या क्रमांकावर आहेत. आता हा मोसम पूर्ण कसा करायचा हा प्रश्‍न लीग संयोजकांसमोर आहे. ३ एप्रिलनंतर नव्याने पुढच्या सामन्यांचे कार्यक्रम तयार करण्याअगोदर किमान तीन फेऱ्या तरी पूर्ण होणे आवश्‍यक आहे. या लीगची सांगता २४ मे रोजी होणार आहे. लीगचा कालावधील पुढे ढकलणेही कठीण आहे, कारण १२ जूनपासून युरो अजिंक्‍यपद स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी पात्र ठरलेल्या १२ देशांत इटलीचाही समावेश आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News