मादाम तुसाँ संग्रहालयात करणचा पुतळा...

सकाळ वृत्तसेवा ( यीनबझ )
Friday, 5 April 2019

सिंगापूर येथील मादाम तुसाँ संग्रहालयात अनेक दिग्गज व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारले आहेत. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आठ वर्षांचा असताना त्याने या संग्रहालयाला भेट दिली होती.

सिंगापूर येथील मादाम तुसाँ संग्रहालयात अनेक दिग्गज व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारले आहेत. सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आठ वर्षांचा असताना त्याने या संग्रहालयाला भेट दिली होती.

आपलाही येथे मेणाचा पुतळा असावा हे त्याचं स्वप्न. करणचं हे स्वप्न आता सत्यात उतरलं आहे. सिंगापूरमधील मादाम तुसाँ संग्रहालयात त्याचा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

करणने या संग्रहालयाला भेट देत या पुतळ्याचं अनावरण केलं. या वेळी त्याने या पुतळ्याबरोबर सेल्फी काढत हा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला.

करण म्हणतो, ‘लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, की मादाम तुसाँ संग्रहालयात माझा मेणाचा पुतळा असावा. मी या क्षणाची खूप वर्षांपासून वाट पाहत होतो. आता माझं हे स्वप्नही पूर्ण झालं आहे.’ 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News