कोरोनाच्या काळातली तरूणाईची अवस्था

महेश घोलप
Friday, 25 September 2020

कोरोनाच्या काळातली तरूणाईची अवस्था

चीनमध्ये उदयास आलेला कोरोना इतका भयानक पध्दतीने वाढेल असं कोणालाही वाटलं नव्हतं. अख्या जगात कोरोनाने खळबळ माजवली. जगात पहिल्यांदा लॉकडाऊन झालं. ज्या देशांनी सुरूवातीच्या काळात कोरोनाबाबत काळजी घेतली. तिथली परिस्थीती आता निवळायला सुरूवात झाली आणि कुठेतरी निवळली आहे. परंतु भारतासारख्या देशात मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केला, शिरकाव केल्यानंतर सुरूवातीच्या काळात काय करावे याबाबत सरकार संभ्रमात पडले होते. म्हणजे ज्या देशांनी कोरोनाच्या काळात चीनने केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास केला, ते देश कोरोनावर मात करण्यात काही प्रमाणात यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही. देशात मोठ्या प्रमाणात तरूणाई आहे. तरूणाई देशाचा आधारस्तंभ आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक तरूणांचे उद्योग संपले, नोक-या गेल्या, तरूण पडेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करू लागला.
 
मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव भारतात झाला. त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी संशयित लोकांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. कुणाचाही ध्यानीमनी नसताना संपुर्ण भारत बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. कारण कोरोनाने चीनमध्ये केलेला हाहाकार माजवल्यानंतर झालेल्या परिस्थिती सरकारने अभ्यास केला असावा. त्यापुर्वी महाराष्ट्र सरकारनं सर्व मंत्र्यांना विचारात घेऊन आठवडाभर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ज्यांना लॉकडाऊनचा किंवा कोरोनाचा अंदाज अशा नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने आपलं गाव गाठलं. सुरूवातीच्या काळात महाराष्ट्रात अगदी तुरळक प्रमाणात कोरोनाच्या केसेस सापडल्या. पण गावाकडं आलेला तरूण आठ दिवस किंवा पंधरा दिवसांनी परत जाण्याची आशा घेईन आला होता.
शहरात राहणारा तरूण वर्ग कोरोनाच्या भीतीने गावाकडं पळाला. ज्यांना अधिक समज आली होती. त्यांनी सगळं तिथला गाशा गुंडाळला आणि गाव गाठलं. कारण परिस्थीती कधी निवळेल याचा अंदाज कोणीचं बांधत नव्हतं. त्यानंतर केंद्र सरकारकडून एक महिन्याचा लॉकडाऊन जाहीर केला. जाहीर केल्यानंतर काय करावं अशी अवस्था शहरातल्या तरूणाईची झाली. कारण मार्च महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला. की, घाबरलेल्या अवस्थेत असलेली तरूणाई गावाला भेटेल त्या गाडीने जाण्याचा प्रयत्न करू लागली. त्या कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक होऊ नये म्हणून राज्यातली वाहतूक पुर्णपणे थांबवली. अनेक तरूणांनी धाडस करून आपलं गाव गाठलं. ज्यावेळी पोलिसांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला त्यावेळी पोलिसांनी सुध्दा वाहतुकीला अधिक अडवणूक केली नाही. त्यामुळे कोरोना गावाकडं सुध्दा पोहोचला, सरकारच्या नियमावली नुसार कोणत्याही कार्यक्रमाला अधिक नागरिक उपस्थित राहू नये म्हणून काळजी घेतली जाऊ लागली. सगळे सरकारी कार्येक्रम रद्द केले. यामुळे भीतीचं मोठं वातावरण निर्माण झालं.
 
ज्यांना प्रवास करायचा आहे, अशा व्यक्तीसाठी पास सक्तीचा केला, त्यामुळे संबंधित व्यक्ती कोणत्या भागात त्या व्यक्तीला काय बाधा असेल तर तात्काळ इलाज मिळावा हा यामागत हेतू होता. शहरातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवस होम क्वारंटाइन व्हावं लागलं. शहरातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात कोणीचं राहू नये असं ग्रामपंचायतीकडून जाहीर करण्यात आलं. गावकडच्या लोकांना कोरोना हा आजार काय आहे समजलं ही नव्हतं. पण भीती त्यांच्या मनात कायम होती. त्या काळात गावात पोलिस मित्र नेमले गेले. गावात कोणी येऊ नये याची काळजी घेण्यात आली. दुकाने वेळेत उघडली जाऊ लागली. त्यात मुंबईहून आलेल्या तरूणाला एक महिना झाला होता. त्याला कंपनीने अर्धा किंवा एक पगार दिला आणि पुढील पगाराची शक्यता कमी असल्याचं सांगण्यात आलं.
 
एप्रिल महिनात घरात बसून कंठालेले क्रिकेट किंवा इतरत्र कुठे फिरताना दिसला, तर पोलिसांनी बेदम मार दिला. कारण त्याला कोरोनाची लागण होऊ नये, किंवा त्याच्यामुळे कोरोनाची लागण कोणाला होऊ नये. सांगली जिल्ह्यातलं इस्लामपूर हे अधिक चर्चेत आलं कारण तिथंले काही नागरिक हज यात्रेला गेले होते. तिथून आल्यानंतर त्यांनी अनेक नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, तसेच एका लग्नात चौघेही हजर होते. त्यामुळे इस्लामपूर हादरून गेलं. कारण कोणाला काय झालंय हे कळत नव्हतं. तिथं २२ जण कोरोना रूग्ण सापडले. तिथली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आर्मी बोलावण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा पोलिसांनी बंद केल्या, त्यामुळे लोकांचा संपर्क तुटला. गावाकडं आलेला तरूण काय करावं या विचारात पडू लागला. तेवढ्यात अनेक कंपन्यानी वर्क फ्रॉम होम सुरू केलं. रेंज मिळत नाही, लॅपटॉप नाही अशा अनेक तक्रारी कंपनीकडे गेल्या. त्यात तरूण मरगळून जाऊ लागला.
 
अनेक तरूणांनी या काळात मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. कारण या गोष्टीला भांडवलं शु्न्य लागतं. हा व्यवसाय का निवडला असं ज्यावेळी तरूणांना विचारण्यात आलं. त्यावेळी तरूणांनी सांगितलं की, इथं कसल्याही प्रकारचा टॅक्स लागत नाही, मासे पकडण्यासाठी भांडवलं लागत नाही, नाही विकले तरी आपण ते खाऊ शकतो अशी प्रतिक्रिया तरूणांनी दिली. काहींच्या मते मासे आणि खेकडे हे दोन्ही विकल्यास गावकडं राहूनही उत्तम व्यवसाय करता येतो. काही तरूणांनी काम नसल्याने शेतीत लक्ष घातलं. आणि खरीप हंगाम चांगला आणण्यासाठी चांगले शेतात राबले.
 
नोकरी गेल्यानंतर काय करावं हे साहिल नायकवडी या तरूणांना दाखवून दिलं की, इतर ठिकाणाहून येणार भाजीपालाा खरेदी करू लागला आणि दारोदारी विकू लागला. कारण बेरोजगार म्हणून राहणं त्याला पसंद नव्हतं. शहरात मिळत असलेल्या पगारापेक्षा अधिक पैसे मी कोरोनाच्या कामावल्याचे त्याने सांगितले. अनेक तरूणांनी मिळेल ते काम म्हणजे घरकाम (गवंड्याच्या हाताखाली दिवसभर काम करणे) केलं. त्यामुळे त्यांचं घर चाललं असंही म्हणता येईल.
 
दुधातून चांगलं उत्त्पन्न मिळतं हे माहित असल्याने विजय नायकवडी यांनी नोकरी सुटल्यानंतर घरी तीन दुधाच्या गाई घेतल्या, त्यातून ते महिन्याला ३० हजार रूपये कमवू लागले. त्यांना जेव्हा विचारलं ही कल्पना डोक्यात कशी आली त्यावेळी त्यांनी सांगितलं की नोकरी सुटल्यानंतर काय करायचं हे मी मागच्या तीन वर्षापुर्वीच ठरवलं होतं, कारण वडीलोपार्जित जमीन असल्याने हे करावं लागणार परंतु कोरोनाच्या काळात ही संधी चालून आली.
 
अनेक तरूणांनी गावकडं राहिल्यानंतर अनेक ऑनलाईन गोष्टी शिकून घेतल्या. शेअर मार्केट हे आपल्याला चांगलं माहित असलं तरी, सुध्दा त्यातून आपल्याला उदरनिर्वाह करण्याइतपत पैसे मिळू शकतात. काही तरूणांनी ऑनलाईन कोर्सेस केले, त्यामुळे त्यांनी ऑनलाइन घरून काम करता येतील. ज्यांना कंपनीने पुन्हा बोलावलं असं तरूण आपल्या कामावरती रूजू झाले. पण ज्यांनी गावाकडं जे काही सुरू केलं आहे, त्यामुळे ते स्थिरावले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News