जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील कुस्तीपट्टूना राज्यपातळीवर संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 February 2020

संबंधित कुस्तीगीर राज्य क्रीडा कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनात सराव व प्रशिक्षण घेतात.

अकोला : आळंदी येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या कुस्तीगीरांची निवड करण्यात आली आहे.आळंदी येथे राज्यस्तरीय चौथीअजिंक्य पद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आली आहे. स्पर्धेकरीता जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या चार कुस्तीगिरांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये अनिकेत चौरे (७१ किलो), शहजाद हुसेन (८० किलो), आदित्य दामोदर (९२ किलो), परीक्षित बोचरे (११० किलो) यांचा समावेश आहे. संबंधित कुस्तीगीर राज्य क्रीडा कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव यांच्या मार्गदर्शनात सराव व प्रशिक्षण घेतात.

या निवड बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव, तालुका क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी, प्रा. शत्रुघ्न बिडकर, अनिल कांबळे आदींसह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी आदींनी कुस्तीगीरांचे कौतुक केले आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News