राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन 

यिनबझ ऑनलाईन टीम
Thursday, 14 February 2019

या स्पर्धेची प्राथमिक फेरी २३ व २४ फेब्रुवारी रोजी असून अंतिम फेरी २८ फेब्रुवारी रोजी आहे. दरम्यात या स्पर्धेत विजेत्यांसाठी पारितोषिक ठेवण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये आणि करंडक, व्दितीय पारितोषिक १५ हजार रुपये व करंडक, तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये आणि करंडक अशा पद्धतीचे असणार आहे. 

नवी मुंबई : मराठी वाङ्मय मंडळाचे डॉ.विवेक सुन्नपवार नाट्यविष्कार आणि यिनबझ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवेशाची अंतिम तारीख २० फेब्रुवारी असून या स्पर्धेसाठी वेगवेगळ्या शहरांतून स्पर्धेसाठी प्रवेश येत आहेत. यामध्ये मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे, या शहरांचा समावेश आहे. 

या स्पर्धेची प्राथमिक फेरी २३ व २४ फेब्रुवारी रोजी असून अंतिम फेरी २८ फेब्रुवारी रोजी आहे. दरम्यात या स्पर्धेत विजेत्यांसाठी पारितोषिक ठेवण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक ३१ हजार रुपये आणि करंडक, व्दितीय पारितोषिक १५ हजार रुपये व करंडक, तृतीय पारितोषिक ७ हजार रुपये आणि करंडक अशा पद्धतीचे असणार आहे. 

लोकमान्य टिळक महाविद्यालयाकडून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येत असतात. त्या सर्व कार्यक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. यंदा पहिल्यांदाच राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  त्यामुळे या स्पर्धेतही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयतर्फे करण्यात आले आहे.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News