परीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधात राज्य सरकारं एकवटणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

परीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधात राज्य सरकारं एकवटणार

परीक्षांच्या स्थगितीसाठी भाजप विरोधात राज्य सरकारं एकवटणार

नवी दिल्ली - देशात कोरोनाची परिस्थीती गंभीर असतााना, परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळण्यासारखं आहे असं अनेक राज्यांचं मत आहे. त्यामुळं सत्ताधारी भाजप विरोधात इतर पत्र एकत्र आले आहेत. नीट-जेईई परीक्षा स्थगित व्हाव्यात यासाठी आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करणार आहेत. सोनिया गांधी यांच्यासोबत काल सात मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी अटॉर्नी जनरलला भाजप विरोधातील राज्य सरकारांशी बोलून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

मोदी सरकार विरोधात असलेल्या पक्षांना एकत्र करण्यासाठी सोनिया गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बैठक आयोजित केली होती. ही बैठक बुधवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पार पडली. सात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी परीक्षा स्थगित होणं आवश्यक असल्याचं बैठकीत म्हटलं आहे.

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांना सल्ला दिला की, कोरोनामुळे अनेक राज्यांची स्थिती योग्य नाही. त्यामुळे परीक्षा स्थगित करण्यात यावी या मागणीसाठी नरेंद्र मोदींची भेट घेणं गरजेचं आहे का ? त्यानंतर परीक्षा स्थगित करण्यासाठी सुप्रीम कोर्टात पुर्नविचार याचिका दाखल करणं गरजेचं आहे का ? असेही त्या म्हणाल्या. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या मते सर्वांनी मिळून पंतप्रधानाची भेट घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कोर्टात जाण्याआधी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींची भेट घेणं गरजेचं आहे असे म्हणाले.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News