राज्य सरकार 'सारथी'ला देणार आठ कोटींचा निधी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 9 July 2020

मागील कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून ही संस्था राज्यभर चर्चेत आहे. मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी ही संस्था सुरू केली होती.

राज्य सरकार 'सारथी'ला देणार आठ कोटींचा निधी 

मागील कित्येक दिवसांपासून 'सारथी' राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. त्यातचं सुरू असलेल्या चर्चेला आज राज्य सरकारकडून पुर्णविराम देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. त्यामध्ये सारथी बंद केली जाणार नाही, तर सारथीला नियोजनाच्या अधिपत्याखाली घेण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली. 

मागील कित्येक वर्षांपासून विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरून ही संस्था राज्यभर चर्चेत आहे. मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी ही संस्था सुरू केली होती. झालेल्या गोंधळावरून राज्याचे मंत्री वडेट्टीवार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद अधिक चिघळला होता. त्या अनुशंगाने अजित पवार यांनी बैठक घेऊन 'सारथी'ला देणार आठ कोटींचा निधी देणार असल्याचे जाहीर केले.

https://lh3.googleusercontent.com/zsLopKeRn2fufwMV9y2x-NeAp5vCFm5TQG7dX49ALVNdcBbWs4wn7vPhPraaH4ZoTynd3ZDjHPxeb3JkuYn2bBU8VnnZgMMpj-IstNtLuzXCttlqbs8a5-s4imXY5h5U_AcHZRRSKR3TQJs8uMe5f7MyFhKC83Orx5ckP7EO2MW1saPPD6unQHqEJroJFBwTGPIsjCZnYSrX1CazPm2uitptpN8fs3SdQvXaAbfJ3ahD0Qj91RLzixtRtYQjcUDw3rNOQJ4uETfmkjkKF3nHnpiXzUn323zGh0sDD5c5jM_usQMaXn-VFV1PwPO9lJABiSbHDyekvs_msu_4I65bb2cG4ktcfJgSWVGYGovfLG3dj4q4ibzh2Zp01sVbSqQqxZEiYMm9mjKEDMIBoSTfIyl3kX4JQl96Po3kCWCOsQtL1izD0rUVxEUZV6DDnXfqE_M1xPyQAF-N6QkEQFnGeDJFF3x0OejKVnrScDf_7BTfYoDAhDL-G0g4oQNN6L_v81GQeoJnzCM-ILUZwmNKnRXg7VL2ZfMlhoV6iocE4LB6Sy61Oono9YxQh68Iexs26JrhlvB2xabIqNidmfaxopikIAiI3lk6TqZi0CbftS_zduvmwsCh42CiIcrY0fJbyTMGE8lcgdw3Ft75i1Y4E3iMR-SxwilgJNz-T8bxxHZ7mjbYNZyeuhF_hJ-L=w449-h252-no?authuser=0

छत्रपती संभाजीराजे भोसले, विजय वडेट्टीवार यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच विविध समस्यांवरती या बैठकीत चर्चा सुध्दा झाली आहे. बैठक संपल्यानंतर अजित पवारांनी याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती सांगितली. 

मागील काही वर्षात सारथीबाबत गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे मराठा तरूणांपर्यंत एक चुकीचा मॅसेज गेला होता. “सारथी संस्था बंद होणार नाही. तर सारथीला नियोजनाच्या अधिपत्याखाली घेण्यात येईल. त्याबरोबर उद्या सारथीला विजय वडेट्टीवार आठ कोटींचा निधी देतील असं अजित पवार म्हणाले. 

दोन महिन्याच्या कालावधीनंतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत एक बैठक होईल. सारखी संस्था चांगल्या पध्दतीने काम करेल. त्या अनुशंगाने आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाल्याचे अजित पवारांनी सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News