मजूरांचा प्रवास शुल्क राज्य सरकार उचलणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 11 May 2020

परराज्यातील मजुरांची संख्या किती आहे. त्याचे नियोजन महसूल विभाग, गृहखाते, महापालिका प्रशासन सध्या करीत आहे.

मुंबई : परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातले मजूर इतर राज्यांतून येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या मागणीप्रमाणे ही रक्कम निधीतून वर्ग करण्यात येईल. यासंदर्भातील शासन निर्णय आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन विभागाने काढला आहे.

राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून परराज्यातील मजूर, पर्यटक, नागरिक मोठ्या संख्येने राज्यात अडकून पडले आहेत. परराज्यातील मजुरांची संख्या किती आहे. त्याचे नियोजन महसूल विभाग, गृहखाते, महापालिका प्रशासन सध्या करीत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करीत आहे. त्यानुसार रेल्वे प्रवासाच्या खर्चाचा भार उचलावा लागत आहे. याच बरोबर इतर राज्यांत अडकून पडलेल्या राज्यातील मजूर, पर्यटक, प्रवासी यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्याही प्रवास खर्चाचा भार राज्याला उचलावा लागणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News