राज्य नाट्य स्पर्धेत 'या' नाटकाची बाजी 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 13 March 2019

५८ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत फोंडा येथील हंस संगीत नाट्य मंडळ संस्थेच्या ‘अव्याहत’ या नाटकाने बाजी मारली आहे. कोल्हापूरस्थित ‘परिवर्तन कला फाऊंडेशन’च्या ऱ्हासपर्व नाटकास द्वितीय आणि अहमदनगरच्या नगर अर्बन बॅंक स्टाफ कला व क्रीडा मंडळाच्या ‘द ग्रेट एक्‍स्चेंज’ला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे.

मुंबई : सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही पारितोषिके जाहीर झाल्याची घोषणा प्रसिद्धिपत्रकाद्वारे केली आहे. सांगली येथे झालेल्या या राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत ३९ नाट्यप्रयोग सादर झाले. रमेश थोरात, डॉ. दयानंद नाईक, वसंत दातार, अरुण पटवर्धन, विनीता पिंपळखरे यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. 
इतर पारितोषिकांचे मानकरी

दिग्दर्शन : प्रथम- रोहन नाईक (अव्याहत), द्वितीय- किरणसिंग चव्हाण (ऱ्हासपर्व), तृतीय- यशोधन गडकरी (दो बजनिए). नेपथ्य ः प्रथम- माणिकचंद थोरात (नाच्या कंपनी), द्वितीय- प्रशांत निगडे (भू-भू), तृतीय- सचिन गोताड (बायकांना का नाही?).

प्रकाशयोजना : प्रथम- विजयकुमार नाईक (विश्‍वमित्र), द्वितीय- संजय तोडणकर (काळोखाच्या सावल्या), तृतीय- राहुल गायकवाड (विसर्जन). रंगभूषा ः प्रथम- रवीना सुगंधी (बिटवीन द लाईन), द्वितीय- सदानंद सूर्यवंशी (ऱ्हासपर्व), तृतीय - नित्यानंद पेडणेकर (माय कॅरेक्‍टर). संगीत दिग्दर्शन ः प्रथम- हर्ष विजय (निरुपण), द्वितीय- शुभम कवळे (सारंग उवाच), तृतीय- प्रसाद घोटवडेकर (शोध). 

उत्कृष्ट अभिनय : रौप्यपदक- शहाजी भोसले, केतन जाधव, प्रणव जोशी, अनिल दळवी, क्षितीज झावरे, सत्यजित साळोखे, केदार देसाई, प्रशांत निगडे, विशाल पवार, संतोष आबळे, आकांक्षा असनारे, पूनम कुळकर्णी, बकुळ धवने, आरती बिराजदार, स्नेहल बुरसे, लक्ष्मी गाडेकर-पिंपळे, विरीशा नाईक, डॉ. सोनल शिंदे, शुभांगी वाणी, दीप्ती चंदात्रे.

अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र : स्त्री- सोनल तेली, रूपा मुकादम, पूनम घोडे, श्रुती मोहोळकर, सर्वज्ञा कराळे; पुरुष- शिवराज नाळे, रमेश मैंद, अमित कुलकर्णी आणि प्रा. प्रणीत फरांदे, मिहीर पुरंदरे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News