शाळा- महाविद्यालय सुरू करणे सरकारला पडले महागात; 4 हजार 600 विद्यार्थी-शिक्षक कॉरंटाईन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 August 2020

सरकारने शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोरोना विषाणूचा महाभयंकर प्रकोप झाला. 

देशांमध्ये सर्वाधिक कोरणाचा संसर्ग अमेरिकेत पसरला. त्यामुळे अमेरिकेत कोरोनाचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. संक्रमण होण्याचे प्रमाणही वाढले आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने शाळा महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे कोरोना विषाणूचा महाभयंकर प्रकोप झाला. 

या प्रकोपात अनेक शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी बळी पडले आहेत. तब्बल चार हजार सहाशे विद्यार्थी आणि शिक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे कॉरंटाईन करण्याची वेळ आली. विद्यार्थ्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता ट्रम्प प्रशासनाने व्यक्त केली.

अमेरिकेने अग्रगण्य स्थान टिकवण्यासाठी कोरोना लस येण्यापूर्वीच शाळा- महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले. त्यामुळे अमेरिकेतीच्या 24 राज्यातील शाळा- महाविद्यालय सुरु करण्यात आली.  

शाळा- महाविद्यालय कोरोना कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असल्याचे प्रकरणे समोर आली आहे. मिसिपीसी राज्यात एकूण 4 हजार 600 शिक्षक- विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली. 

मिसिपीसीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. थॉमस यांनी दिलेल्या माहितीनुसार 31 शाळेमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळून आला आहे, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आम्ही शिक्षक व विद्यार्थ्यांना कारंटाईन केले.

अलबामा विद्यापीठ सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात कोरोनाचे 566 रुग्ण आढळून आले होते. 

मार्च महिन्यामध्ये अमेरिकी सरकारने शाळांना सुट्या जाहीर केली, गेल्या आठवड्यात पुन्हा विद्यापीठे सुरू करण्यात आले. सध्या 20 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयात येत आहेत.

त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका सरकारने व्यक्त केला. या संपूर्ण प्रकरणाची दखल भारताने घेणे आवश्यक आहे. कोरोनाची खबरदारी न घेता शाळा महाविद्यालय सुरू केल्यास महाभयंकर कोरोनाचा प्रकोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News