निकालाधीच ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • शुक्रवारपर्यंत अडीच हजार विद्यार्थ्यांची नोंदणी
  • कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांची ग्वाही

औरंगाबाद - जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीला ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला शनिवारपासून (ता. एक) सुरवात झाली. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग- १ भरण्यासाठी संकेतस्थळावर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करण्यात आली. शुक्रवारपर्यंत दोन हजार ६४५ विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 

पुणे, मुंबईच्या धर्तीवर मागील वर्षापासून औरंगाबाद मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली. यंदा मनपा हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या १११ एवढी असून त्यातील प्रवेश क्षमता २८ हजार ४०० एवढी आहे. दोन महाविद्यालयांचे व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर अंतिम प्रवेश क्षमता जाहीर होईल. दहावीच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अर्जाचा भाग-२ विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. अर्ज भरण्याची ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जासोबत विविध कागदपत्रे सबमिट करावी लागतील.

सर्व कागदपत्रे सादर केल्याशिवाय प्रवेश निश्‍चित करण्यात येणार नाही. दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा जिल्हा बदलून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याच्या मूळ दाखल्यावर यू-डायस क्रमांक नमूद करावा लागणार आहे. यू-डायस कोड नसल्यास संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांची प्रतिस्वाक्षरी घेणे आवश्‍यक आहे. विशेष किंवा समांतर आरक्षणाचा फायदा घेऊन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेचे मूळ गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, विशेष आरक्षणास पात्र असल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

शनिवारपासून सुरू झालेल्या नोंदणी प्रक्रियेत शुक्रवार ७ जूनपर्यंत २ हजार ६४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ हजार ८९१ विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी झाली आहे; तर ७५४ अर्जांची अद्यापपर्यंत पडताळणी बाकी आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News