अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षांना सुरूवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 26 September 2020

कोरोनाच्या काळात रखडलेल्या परीक्षा विद्यापीठाकडून परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची काळजी पाहूण घेण्याचं ठरवलं आहे. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० च्या अंतिम वर्ष / सत्राच्या बॅकलॉगच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या. मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आज परिक्षा दिल्या. आज विद्यार्थ्यांच्या चार शाखेच्या बॅकलॉगच्या परीक्षा व्यवस्थित पार पडल्या.

सोप्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठाने आणि महाविद्यालयांनी ऑनलाईन मल्टीपल चॉईस प्रश्नांच्या स्वरुपात परीक्षा घेतल्या. विद्यार्थ्यांची पूर्वतयारी व्हावी तसेच परीक्षा सुरू असताना कोणतीही अडचण येऊ यासाठी पूर्वी सराव परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राहिलेल्या विषयांच्या सराव परीक्षा सुध्दा लवकरचं घेण्यात येतील. विद्यार्थ्यांला परीक्षा देताना काही तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्यास त्याला पुन्हा परीक्षा देता येईल असं परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
 
परीक्षांच्या आयोजनासाठी विद्यापीठाकडून संलग्न महाविद्यालयांचे ९४ समुह तयार केले आहेत. समुह महाविद्यालयांनी त्यांच्या वेळापत्रकानूसार परीक्षेचं आयोजन केलं आहे असंही  डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले.
 
कोरोनाच्या काळात परीक्षा कश्या होतील याबाबत पालक आणि विद्यार्थीही संभ्रमात होते. परंतु युसीजी विद्यापीठाकडून आखून देण्यात आलेल्या नियमावलीनूसार परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानुसार अंतिम वर्षाच्या बॅकलॉगच्या परीक्षांना सुरूवात झाली. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा देताना अडचण निर्माण होईल अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यात येणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News