आयपीएलचे ‘फटाके’ दिवाळीतही वाजायला हवेत स्टार स्पोर्टस्‌चा आग्रह; तर बीसीसीआयचा विरोध

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 21 July 2020
  • विश्वकरंडक ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा अधिकृतपणे लांबणीवर पडण्याचा अधिकृत निर्णय आयसीसीने घेतलेला नसला, तरी बीसीसीआयने आयपीएलचा कार्यक्रम निश्‍चित केला; परंतु दिवाळीच्या काळात सामने नसल्यामुळे ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्टस्‌ नाराज झाल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली :- विश्वकरंडक ट्‌वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा अधिकृतपणे लांबणीवर पडण्याचा अधिकृत निर्णय आयसीसीने घेतलेला नसला, तरी बीसीसीआयने आयपीएलचा कार्यक्रम निश्‍चित केला; परंतु दिवाळीच्या काळात सामने नसल्यामुळे ब्रॉडकास्टर्स स्टार स्पोर्टस्‌ नाराज झाल्याचे वृत्त आहे.

ऑस्ट्रेलिया दौरा लक्षात घेऊन बीसीसीआयने आयपीएसाठी २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर हा कालावधी जवळपास निश्‍चित केला आहे. १४ नोव्हेंबरला दिवाळी आहे आणि स्टार स्पोर्टसला या आठवड्यापर्यंत आयपीएल खेळवायची आहे.
दिवाळीची मोसम आणि स्पर्धा सामने ही संकल्पना गेल्या काही वर्षांपासून मागे पडलेली आहे, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. बीएआरसीच्या अहवालानुसार (ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कॉन्सिल) दिवाळीच्या सुट्टीत क्रिकेट सामन्यांचे रेटिंग कमी झालेले असते. त्यामुळे आम्हीही सामन्यांचे आयोजन करत नाही. खेळाडूंनाही सुट्टी मिळते आणि तेही आपापल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करत असतात, असे बीसीसीआयचा पदाधिकारी म्हणाला.

आयपीएलच्या तारखांबाबत आम्ही स्टार स्पोर्टस्‌ शी चर्चा करून मार्ग काढू, ते केवळ आयपीएलच नव्हे, तर भारतातील क्रिकेट प्रक्षेपणाचेही हक्क त्यांच्याकडे आहेत. दिवाळीच्या काळात सर्वच जण सण साजरा करण्यात गुंतलेले असल्यामुळे सामन्यांकडे त्यांचे लक्ष नसते; त्यामुळे रेटिंग कमी झालेले असते, याची माहिती स्टार स्पोर्टसलाही असल्याचे बीसीसीआयच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले.

फ्रॅंचाईसना चिंता नाही

सध्याच्या काळात आयपीएल होणे, हे महत्त्वाचे आहे. दिवाळीत सामने खेळवण्याचा मुद्दा थेट आमच्याशी संबंधित असेल, असे वाटत नाही. भारतात आयपीएल झाली असती आणि दिवाळी सणात स्टेडियमवर गर्दी झाली असती, तर आम्ही त्याचा विचार केला असता, असे आयपीएलच्या एका फ्रॅंचाईसने सांगितले.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कार्यक्रमही महत्त्वाचा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताचा पहिला कसोटी सामना ३ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. विलगीकरणाचे १४ दिवस, त्यानंतर सरावाचे काही दिवस यांचा मेळ लावायचा असेल, तर आयपीएल नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत खेळवणे अवघड जाणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News