असा गाठा १२ वी नंतरच्या करिअरचा टप्पा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

१२वीचे शिक्षण हे अवघड जरी असले तरीही विद्यापीठाच्या शिक्षणाला बारावीनंतरच सुरुवात होते.

१०वी आणि १२वी नंतरचा टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असतो.   नेमके मुलांचा  व  पालकांचा येथेच गोंधळ होतो, नक्की १०वी आणि १२वी नंतर काय करावे हे निवडणे प्रत्येकाला अवघड जाते. आपण कोणते  करिअर करावे . कोणत्या क्षेत्राची निवड करावी हा प्रश्न निर्माण होतो.  

१०वी आणि १२वीचे शिक्षण हे शालेय क्षेत्रात मोजले जाते, तसेच हे शिक्षण हे टप्प्यात मोजले जाते. १२वीचे शिक्षण हे अवघड जरी असले तरीही विद्यापीठाच्या शिक्षणाला बारावीनंतरच सुरुवात होते. १२वी नंतरचे शिक्षण निवडताना किंवा प्रवेश घेताना, १२वी मध्येच त्यांनी काही विशिष्ट विषय निवडायला हवे. तसेच १२वी नंतर काय करायचे आहे. हे अगोदरच ठरवायला हवे. यामुळे पुढे करिअर निवडताना सोपे जाते. तसेच १२वी नंतर करिअर कोणते निवडावे याबाबत सविस्तर माहिती हे पुढील प्रमाणे

१) अॅक्च्युरियल सायन्स, बी.एस्सी.(आय.टी.) - साठी  १२ वी कोणत्याही क्षेत्रातून करा, पण गणित हा विषय घेणे आवश्यक आहे. 
२) आर्किटेक्चर - आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना गणिताबरोबरीनेच भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय देखील १२ वीला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या वर्षी १०वीची परीक्षा दिलेल्या व आर्किटेक्चरला प्रवेश घेण्यासाठी ११वी  घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ११ वीला विज्ञान क्षेत्रात प्रवेश घेणे आवश्यक आहे 
३) इंजिनीअरिंग, मर्चंट नेव्ही, एन.डी.ए. (हवाई दल व नौदल प्रवेशासाठी), अॅग्री इंजिनीअरिंग -  तसेच यासाठी १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित हे तीन विषय घेणे आवश्यक आहे 
४) मेडिकल अभ्यासक्रम, पॅरामेडिकल अभ्यासक्रम, पशुवैद्यकीय अभ्यासक्रम, फिशरीज सायन्स, ऑप्टोमेट्री, डेंटल मेकॅनिक - १२ वी विज्ञान क्षेत्रात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषय घेणे अति आवश्यक आहेत. 
५) कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम व बी. एस्सी. (बायोटेक्नोलॉजी) साठी १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र विषय आवश्यक आहेत. 
६) फार्मसी पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र या विषयासोबत गणित किंवा जीवशास्त्र विषय घेणे आवश्यक आहे. 
७) पदवीला मानसशास्त्र विषय घ्यायचा असेल तर ११वीलाच मानसशास्त्र विषय घेणे उपयुक्त ठरते. 
८) फाइन आर्ट्सच्या पदवीला प्रवेश देताना चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेतील ग्रेडनुसार १० पैकी गुण दिले जातात. (ए ग्रेड - १० गुण, बी ग्रेड - ६ गुण, सी ग्रेड - ४ गुण) त्यामुळे फाइन आर्ट्सला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेत इंटरमिजिएटची परीक्षा दिली नसल्यास ११वीला असताना इंटरमिजिएट परीक्षा देणे उपयुक्त ठरेल. 
९) कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या वेळी १२वीच्या गुणांना ३० टक्के वेटेज असते. तसेच आर्किटेक्चर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १२वी बोर्डाच्या परीक्षेतील गुणांना ५० टक्के वेटेज असल्याने १२वीच्या परीक्षेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News