स्टाफ सिलेक्शन कमिशन पदांची भरती परीक्षा जाहीर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 September 2020
 • कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्वच परीक्षा लांबणीवर गेल्या होत्या.
 • परंतु आता सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे.
 • कर्मचारी भरती आयोगाने २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

मुंबई :- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे सर्वच परीक्षा लांबणीवर गेल्या होत्या. परंतु आता सर्व परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. कर्मचारी भरती आयोगाने २०२०-२१ साठी आपल्या विविध भरती परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. स्टाफ सिलेक्शन कमिशनने आपले संकेतस्थळ ssc.nic.in वर २०२०-२१ मध्ये होणाऱ्या भरती परीक्षांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे.

यात एसएससी सीएचएसएल, एसएससी सीजीएल, एसएससी ज्युनियर इंजीनियर, स्टेनोग्राफर आणि मल्टी-टास्किंग स्टाफ परीक्षांच्या तारखांची घोषणा झाली आहे.

या परीक्षा १ ऑक्टोबर २०२० ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. स्टाफ सिलेक्शनद्वारे पूर्ण कॅलेंडर येथे देण्यात येत आहे. पुढे दिलेल्या लिंकद्वारेदेखील हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येईल.

 • एसएससी सीएचएसएल २०१९ (टियर १) :- १२ ऑक्टोबर २०२० ते २६ ऑक्टोबर २०२०
 • एसएससी ज्युनियर इंजीनियर २०१९ (पेपर १) - २७ ऑक्टोबर २०२० ते ३० ऑक्टोबर २०२०
 • एसएससी सीजीएल २०१९ (टियर २) - ०२ नोव्हेंबर २०२० ते ०५ ते १८ नोव्हेंबर २०२०
 • एसएससी स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्झाम २०१९ - १६ नोव्हेंबर २०२० ते १८ नोव्हेंबर २०२०
 • एसएससी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रांसेलटर २०२० (पेपर १) - १९ नोव्हेंबर २०२०
 • एसएससी सीजीएल २०१९ (टियर ३) - २२ नोव्हेंबर २०२०
 • दिल्ली पोलीस सब-इन्स्पेक्टर आणि सीएपीएफ एग्जाम २०२० (पेपर १) - २३ नोव्हेंबर २०२० ते २६ नोव्हेंबर २०२०
 • दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल एक्झिक्युटिव्ह २०२० (पेपर १) - २७ नोव्हेंबर २०२० ते १४ डिसेंबर २०२०
 • ज्युनियर इंजीनियर एक्झाम २०१९ (पेपर २) - ३१ जानेवरी २०२१
 • एसएससी सीएचएसएल २०१९ (टियर २) - १४ फेब्रुवारी २०२१
 • ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, सीनियर हिंदी ट्रान्सलेटर २०२० (पेपर २) - १४ फेब्रुवारी २०२१
 • ज्युनियर इंजीनियर २०२० (पेपर १) - २२ मार्च २०२१ ते २५ मार्च २०२१
 • दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ और सीआईएसएफ असिस्टेंट सब-इन्स्पेक्टर एक्झाम २०१९ (पेपर २) - २६ मार्च २०२१
 • स्टेनोग्राफर ग्रेड सी अँड डी एग्जाम २०२० - २९ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२१
 • एसएससी सीएचएसएल २०२० (टियर १) - १२ एप्रिल २०२१ ते २७ एप्रिल २०२१
 • एसएससी सीजीएल २०२० (टियर १) - २९ मे २०२१ ते ७ जून २०२१
 • दिल्ली पोलीस सब-इंस्पेक्टर, सीएपीएफ एग्जाम २०२० (पेपर २) - १२ जुलै २०२१
 • एसएससी मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) २०२० (पेपर १) - १ जुलै २०२१ ते २० जुलै २०२१
 • आसाम रायफल्समध्ये सीएपीएफ कॉन्स्टेबल (जीडी), एनआईए, एसएसएफ और रायफलमॅन (जीडी) एग्जाम २०२० - २ ऑगस्ट २०२१ ते २५ ऑगस्ट २०२१

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News