वर्ल्डकप फुटबॉलमध्येही कर्मचाऱ्यांची कपात 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 July 2020

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसही फटका बसत आहे, त्याचे परिणाम आता विश्वकरंडक फुटबॉलवरही दिसू लागले आहेत.

दोहा : कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसही फटका बसत आहे, त्याचे परिणाम आता विश्वकरंडक फुटबॉलवरही दिसू लागले आहेत. दोन वर्षांनी विश्वकरंडक फुटबॉल घेणार असलेल्या कतारच्या संयोजकांनी कर्मचारीकपात करण्याचे ठरवले आहे.

विश्वकरंडकाचे पुरस्कर्ते असलेल्या कतार एअरवेज तसेच दोहातील बेईन स्पोर्टस्‌नेही नुकतीच कर्मचारीकपात केली आहे. मात्र आता तीन स्टेडियम पूर्ण आहेत. अन्य स्टेडियमचे काम 85 टक्के झाले आहे, त्यामुळे सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता नाही. आता कामाचे स्वरूप बदलणार आहे. त्यामुळे ते काम करणारेही बदलत आहेत, असे कतार फुटबॉल महासंघाकडून सांगण्यात आले. मात्र किती जणांना निरोप दिला आणि किती जणांना नव्याने घेणार, याबाबत काहीही टिप्पणी केली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News