दहावीच्या परीक्षेत नेहमी मुलींचीच बाजी का? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

राज्यनिहाय आकडेवारी पाहता दहावीचा ७७ टक्के निकाल लागला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचा निकाल १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. 

मुंबई: अनेक दिवसांच्या प्रतीक्षेत असलेल्या दहावीचा निकाल आज जाहीर झाला. "महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा'च्या वतीने आज अधिकृतरीत्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. कोकण विभाग यामध्ये अव्व्ल ठरले असून नागपूर विभागाचा निकाल मागे पडला आहे. राज्यनिहाय आकडेवारी पाहता दहावीचा ७७ टक्के निकाल लागला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचा निकाल १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. 

राज्यातून परीक्षेला  १६ लाख १८ हजार ६०२ विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये विद्यार्थिनींची संख्या होती ७ लाख ४८ हजार ७१५ आणि विद्यार्थ्यांची संख्या होती ८ लाख ७० हजार ८८७ एवढी होती.  यामध्ये सगळ्यांपैकी एकूण १२ लाख ४७ हजार ९०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये विद्यार्थिनींचा निकाल हा ८२.८२ टक्के इतका लागला आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे ७२.१८ टक्के लागला आहे. त्यामुळेच यंदाच्या निकालातही नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. विद्यार्थिनींचा निकाल हा विद्यार्थ्यांच्या तुलनेत १०.६४ टक्क्यांनी जास्त लागला आहे. 

गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता सातत्याने मुलीचं अव्वल ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 • २०१८ मध्ये राज्याचा निकाल ८९.४१ टक्के लागला होता, यामध्ये ८२.८२ टक्के मुली तर ७२. १८ टक्के मुले उत्तीर्ण झाली होती.  
   
 • २०१७ मध्ये राज्याचा निकाल ८८. ७४ टक्के लागला होता. यामध्ये ९०. ५० टक्के मुली तर ८३.४६ टक्के  मुले उत्तीर्ण झाली होती. 
   
 • २०१६ मध्ये राज्याचा निकाल ९१. ४१ टक्के लागला होता. यामध्ये ९१. ४९ टक्के मुली तर ८७.९८ टक्के  मुले उत्तीर्ण झाली होती.
   
 • २०१५ मध्ये राज्याचा निकाल ९१. ४६ टक्के लागला होता. यामध्ये  ९२. ९४ टक्के मुली तर ९०. १८ टक्के मुले उत्तीर्ण झाली होती. 
   
 • २०१४ मध्ये राज्याचा निकाल ८३. ४८ टक्के लागला होता. यामध्ये ९०. ५५ टक्के मुली तर ८६. ४७ टक्के मुले उत्तीर्ण झाली होती. 

राज्यातल्या एकूण शाळांपैंकी १७३४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे. तसंच  ८३.०५ टक्के दिव्यांग विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश मिळवलं आहे. यंदाच्या परीक्षेचा निकाल १२ टक्क्यांनी घसरल्याचे पहायला मिळत आहे. यंदा दहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. त्याचप्रमाणे नवीन परीक्षा पद्धतीही अवलंबण्यात आली होती. त्यामुळे हा निकाल घसरल्याचं पाहायला मिळत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News