शेकडो वर्षांची परंपरा असलेली 'सिरसंगीची' यात्रा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 8 May 2019

सिरसंगीत यात्रेनिमित्त गावकरी एकवटले आहेत. गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गावच्या समृद्ध परंपरेचा वारसा जोपासण्याबरोबर त्याची पुढच्या पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.

सिरसंगीत यात्रेनिमित्त गावकरी एकवटले आहेत. गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. गावच्या समृद्ध परंपरेचा वारसा जोपासण्याबरोबर त्याची पुढच्या पिढीला ओळख करून देण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.

मंगळवारी रात्री ८ वाजता लक्ष्मीची भव्य मिरवणूक झाली. रात्रभर लक्ष्मी खेळवली गेली. महालक्ष्मी ही सिंहावर आरूढ आहे. बुधवारी सकाळी १० नंतर लक्ष्मी गदगेला बसणार आहे. दहा वाजता विविध धार्मिक व मानाचे कार्यक्रम होतील. हकीमदार यांच्याकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होईल. 

त्यानंतर माहेरवाशिणींचा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू होईल. हा कार्यक्रम शुक्रवार पर्यंत चालेल. दुपारी तीननंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. पंधरा वर्षांनंतर होणाऱ्या यात्रेनिमित्त ३ मे रोजी इरडे पडण्याचा कार्यक्रम झाला. गावातील सर्व देवदेवतांची यात्रा (थळ कामनुक) पार पडली. या वेळी हकीमदार, मानकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. यात्रेच्या निमित्ताने माहेरवाशिणी, पै-पाहुण्यांची गर्दी झाली आहे. 

यात्रेच्या निमित्ताने गावातील महादेव मंदिर, श्री रवळनाथ, श्री लक्ष्मी मंदिर, विठ्ठल मंदिर, विश्‍वकर्मा मंदिर, गोरोबाकाका आदी मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली असून रंगरंगोटीही करण्यात आली आहे. 

यात्रा पार पाडण्यासाठी सिरसंगी स्थानिक ग्रामस्थ मंडळ, मुंबईकर ग्रामस्थ मंडळ, गावातील तरुण मंडळे, पतसंस्था, दूध संस्था, सेवा संस्था, ग्रामपंचायत या सर्वांचे पदाधिकारी, सर्व सदस्य, यात्रा समिती व उपसमित्या विशेष प्रयत्नशील आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News