झणझणीत मटन करी; जाणून घ्या कशी बनवावी रेसिपी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 25 August 2020

कमी वेळामध्ये अतिशय चवदार आणि टेस्टी मटन करी रेसिपी कशी बनवावी हे सांगणार आहोत.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. काही झणझणीत खाण्याची इच्छा खवय्यांना असते, अशा ऋतूमध्ये खवय्यांसाठी आम्ही खास मटन करी रेसिपी घेऊन आलो आहोत. कमी वेळामध्ये अतिशय चवदार आणि टेस्टी मटन करी रेसिपी कशी बनवावी हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया चंपारण मटन करी रेसिपी

मटन करी साहित्य 

एक किलो मटन, 175 ग्रॉम कापलेला कांदा, दोन लसाचे गड्डे, तीन चमच आद्रक लसुन यांची पेस्ट, एक चमच हळद पावडर, दोन चमचे देगी मिरची पावडर, दोन चमचे काश्मिरी मिरची पावडर, दोन चमचे लिंबाचा रस, दीडशे ग्रॅम दही, दोन कप सरसोचे तेल, एक कप सोप पावडर, एक कप गरम मसाला, 10 लवंग, 8 काळी मिरची, दोन दालचिनी,1 तेजपत्ता, चार चमचे जीर, एक चमचा जिरा पावडर, गव्हाच पीठ आणि स्वादानुसार मिठ 

कृती

सरसोच्या तेलामध्ये एक किलो मटण आणि सर्व साहित्य पदार्थ एकत्र मिसळुन घ्या, त्याला वीस मिनिट मॅग्नेट करण्यासाठी ठेवा. दुसरीकडे एक मातीच भांड किंवा जाड पातेल घेऊन त्यामध्ये उरलेले तेल आणि मॅग्नेट टाका. झाकणाला पिठ लावून गच्च भांड्यावर ठेवा. वाफ बाहेर जाणार नाही याची खात्री करुन घ्या. त्यानंतर मोठ्या जाळावर हे भांड ठेऊन द्या. हळूहळू जाळ कमी करत रहा. 45 ते 50 मिनिटांमध्ये मटन करी शिजवून पूर्ण होईल. 45 मिनिटानंतर झाकलेले प्लेट काढून तेल वर आले आहे का याची खात्री करुन घ्या. तेल वर आले असेल तर चिकन करी तयार झाली असे समजा. त्यावर कोथिंबिर आणि धनिया पावडर टाकून गरम- गरम खाऊ शकता.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News