एसपीआय : एनडीए प्रवेशाचा गेटवे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ )
Wednesday, 20 November 2019

विद्यार्थ्याची पात्रता
विद्यार्थी महाराष्ट्र आधिवासी म्हणजेच डोमेसाइल हवा. केवळ अविवाहित पुरुषच अर्ज करू शकतात. अर्ज मात्र/एप्रिल-२०२० मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालान्त परीक्षेला बसलेला असणारा पाहिजे. जून - २०२०मध्ये प्रवेशासाठी पात्र असावा. 
इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामान्यविज्ञान, गणित या विषयांसह दहावीत शिकणारे विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र आहेत. दहावीत किमान ६० टक्के गुण प्राप्त असावेत, तसेच संबंधित विद्यार्थ्याला सातवी ते नववी या इयत्तांमध्येही किमान ६० टक्के गुण असावेत.

शारीरिक पात्रता
उमेदवाराचे उंची १५७ सेंटिमीटर, वजन ४३ किलो, छाती न फुगवता ७४ व फुगवून ७९ सेंटिमीटर असावी. दृष्टी चष्मा लावून जास्तीत ६/९, तसेच रातांधळेपणा नसावा. 

ऑनलाइन अर्ज
संस्थेच्या www.spiaurangabad.com या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध होतात. ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख १५ फेबुवारी २०२० असून, परीक्षा शुल्क ४५० रुपये आहे. ते ऑनलाइन पद्धतीने नेटबॅंकिंग, कार्डद्वारे भरण्याची सोय आहे. अर्ज भरण्यापूर्वी अन्य माहिती संकेत स्थळावरून घ्यावी.

लेखी परीक्षा व मुलाखत
लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून एप्रिल/मे २०२० मध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, नागपूर केंद्रांवर होते. परीक्षा एमसीक्यू म्हणजे चार पर्यायांतून एक निवडा अशा पद्धतीने होते. परीक्षा १५० गुणांची, गणिताचा ७५, तर सामान्य ज्ञानासाठी ७५ गुणांचा पेपर असतो. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असतो. ही परीक्षा आठवी ते दहावीच्या राज्य बोर्ड व सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित असते.

परीक्षा ओएमआर शीटवर (संगणकावर नाही) असेल. प्रत्येक उत्तराला एक गुण व चुकीचा पर्याय नोंदविल्यास अर्धा गुण वजा होईल, याची नोंद घ्यावी. लेखी परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संकेतस्थळावर उपलब्ध होईल. गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांना मुलाखत कार्यक्रमाबद्दल स्वतंत्रपणे मेसेज अथवा ईमेलद्वारे माहिती दिली जाते. मुलाखत इंग्रजीत होते. लेखी परीक्षा त्यानंतर मुलाखत व शेवटी वैद्यकीय चाचणी होते.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App playstore

Related News