अभिमानास्पद! लाखो रुपये खर्चुन 'जे' शिक्षण व्यवस्थेला जमलं नाही 'ते' विनामुल्य तरुणाने करुन दाखवलं

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा- यिनबझ)
Tuesday, 18 August 2020

एकिकडे भलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक लॉकडाऊन काळात घरी बसून आहेत, तर दुसरीकडे एक रुपयाही मानधन न घेता विनामुल्य शिक्षण देण्यात काम अवलिया तरुण करत आहे.

नांदेड : 'शिक्षण हे विघिनीचे दूध आहे, जो प्राशण करेल तो घुरघुरल्या शिवाय राहणार नाही' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार किनवट शहरातील शिवाजी नगर परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना तंतोतंत लागू होतात. एका अवलिया तरुणाच्या नव कल्पेनेतून लॉकडाऊन कळात शालेय विद्यार्थी अभिनव शाळेत ज्ञान अर्जनाचे काम करत आहे. लॉकडाऊन काळात सुरु केलेली अभिनव शाळा चर्चेचा विषय बनली आहे. लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सरकारने ऑनलाईन शिक्षण, ई- लर्निंग, गुगल क्लासरुन, झुम, व्हट्सअॅप अशा विविध तंत्रज्ञानात वापर केला. यासाठी लाखो रुपये खर्च केले. ग्रामीन भागात वीज, इंटरनेट, मोबाईल, संगणक, इलेक्टॉनिक साहित्य विद्यार्थ्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा बट्याबोळ झाला. अशा परिस्थितीत डी. एड् झालेल्या तरुणाने शारीरिक नियमाचे अंतर पाळून, विद्यार्थ्यांच्या तोंडाला मुखपट्टी बंधून अभिनव शाळा सुरु केली. विनामुल्य विद्यार्थ्यांना शिकवण्यात काम अवलिया तरुन करत आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने देशात टाळेबंदी जाहीर केली, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. शाळा बंद असल्यामुळे पाच महिन्यापासून विद्यार्थी घरातच  आहेत. घरात कोंडून ठेवण्यात आलेल्या  विद्यार्थ्यांसाठी अभिनव शाळा सुरु करण्याचा विचार तरुणाने केला, पालकांच्या मनात सुरुवातीला मुलांच्या आरोग्याची काळजी होती आणि कोरोना भिती दिवसेंदिवस वाढत होती. अशा परिस्थितीत तरुणाने पालकांचे योग्य समुपदेश केले, त्यांच्या मनात असलेली भिती समुपदेशनामुळे कमी झाली. पालकांनी मुलांचा अभ्यास वर्गात पाठवण्यास सुरुवात केली. आणि विद्यार्थ्यांची नियमीत अभिनव शाळा सुरु झाली. सध्या दररोज दहा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी नियमीत येतात. ही शाळा किनवट महानगरपालिकेच्या शिवाजी मंगल कार्यालयात भरत आहे. कोणतही फी न घेता विद्यार्थ्यांना विनामुल्य ज्ञानदानाच काम आशिर्वाद रामलू वासरके हा अवलिया तरुण करत आहे.

शिक्षण होण्याचे स्वप्न उराशी बाळगून आशिर्वादने डी.एड् केले. चांगल्या मार्काने पास झाला. त्यानंतर टीईटी परीक्षा दिली त्यातही उत्तम मार्क मिळविले. शासनाने शिक्षक भर्ती स्थगीत केली. त्यामुळे आशिर्वादने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद गाठले. जिद्द, चिकाटी आणि कठोर अभ्यास सुरु केला, मात्र काही दिवसात टाळेबंदी सुरु झाली. त्यामुळे आशिर्वादने आपला मोर्चा पुन्हा गावाकडेकडे वळवला. कोरोना विषाणूने देशभर धुमाकूळ घातला होता, सर्वत्र कोरोनाची दहशत निर्माण झाली होते अशा परिस्थिती आशिर्वादला मनातला शिक्षण शांत बसू देत नव्हता. कोमडीला जसे खुराड्यात डांबुन ठेवतात तसे पालकांनी आपल्या पाल्यांना घरामध्ये डांबून ठेवले होते. त्या मुळे लहान मुलाच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ लागले खेळणाऱ्या  बागडणाऱ्या मुलांना कोंडून ठेवण्यात येऊ लागले अशा विद्यार्थ्यांना शिवण्याचा निश्चय आशिर्वादने केला आणि विद्यार्थ्यांना खुराड्यातून सोडवून शिक्षणाच्या ज्ञानभांडारात घेऊन गेला. शिक्षाणाच्या बाजारीकरणात विद्यार्थ्यांना विनामुल्य शिकवणाच महाज्ञान देऊ लागला. ग्रामीण भागतील प्रत्येक गावच्या सुशिक्षित तरुणांनी दररोज १० मुलांना शिकवले तर विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल. आणि तरुणांच्या ज्ञानाचा फायदा देशाला होईल.  

'एक महिन्यापासून मराठी, गणित, विज्ञान, इंग्रजी असे महत्त्वपुर्ण विषय विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम अवलियाने सुरु केली, ग्रामीण भागातील विद्यार्थी फारच कच्चे आहेत असे जाणवल्यानंतर त्यांना सुरुवातीपासून शिकवण्यास सुरुवात केली. एक महिन्यानंतर त्यांची परीक्षा घेतील या परीक्षेत विद्यार्थी प्रगती पथावर आहे. हे त्यांच्या मार्कावरुन नाही तर प्रत्यक्ष कृतीतून जानवले' असे अशिवाद यांनी सांगितले.

कोरोनाच्या भितीमुळे सरकारने प्रत्यक्ष अध्यापन बंद केले. आणि ऑनलाईन शिक्षण सुरु केले, मात्र आदिवासी किनवत तालुक्यात वीज, इंटरनेट, साधनांची कमतरती असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा खोळंबा झाला. अशा परिस्थिती जिल्हा परिषदेणे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ठोस योजना आखणे अपेक्षित होते. मात्र लोकप्रतिनिधी, पालक यांनी शिक्षण व्यवस्थेकडे लक्ष न दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे आतोनात नुकसान झाले. एकिकडे भलेलठ्ठ पगार घेणारे शिक्षक लॉकडाऊन काळात घरी बसून आहेत, तर दुसरीकडे एक रुपयाही मानधन न घेता विनामुल्य शिक्षण देण्यात काम अवलिया तरुण करत आहे. शिक्षण विभागाने डोळ्यावर झाकलेली कोरोनाची पट्टी काढून तरुणाचा आदर्श घ्यायला हवा. आणि प्रक्षत्य अध्यायनासाठी काही ठोस उपाय योजना आखायला हव्या, नाही तर 'नळी फुंकली सोनारे, ईकडून वारा तिकडे जाई रे' असे होईल.    
   

 

"सर्व गोष्टी शासनानेच कराव्यात असा सामाजामध्ये भ्रम आहे, मात्र आपणही या समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला, त्यांमुळे माझ्या शिकवणीला अधिकच बळ मिळाले. सुरुवातीला विद्यार्थी, पालक, कुटुंबीय यांच्या मनात कोरोनाची भिती होती, मात्र हळूहळू कमी झाली. आरोग्याचे नियम पाळले आणि प्रणाणिक प्रयत्न केले तर कोरोना काळात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिकवणे सोपे आहे. माझ्या अनुभवारुन हे जाणवले, आपल्याकडे प्राणाणिक प्रयत्न होत नाही हे विद्यार्थ्यांना शिकवतेवेळी लक्षात आले. त्यासाठी शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याची आवश्यकता आहे."
- आशिर्वाद .रा. वासरके , तरुण 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News