औरंगाबाद विद्यापीठाच्या या उपपरिसराचा विकास होणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येत्या आर्थिक वर्षात तरतूद केलेली सर्व विकासकामे लवकरच सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. उपपरिसर मंडळाच्या सदस्यांसोबत शुक्रवारी (ता. सात) व्यवस्थापन परिषद कक्षात बैठक घेण्यात झाली.

औरंगाबाद -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद उपपरिसराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येत्या आर्थिक वर्षात तरतूद केलेली सर्व विकासकामे लवकरच सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी दिली. उपपरिसर मंडळाच्या सदस्यांसोबत शुक्रवारी (ता. सात) व्यवस्थापन परिषद कक्षात बैठक घेण्यात झाली.

बैठकीला व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर, डॉ. जयसिंग देशमुख, डॉ. अशोक मोहेकर, डॉ. गोविंद काळे, प्रा. संभाजी भोसले, नितीन बागल, संचालक डॉ. मनार साळुंके, उपकुलसचिव आय. आर. मंझा यांची उपस्थिती होती. बैठकीत अर्थसंकल्प २०१९-२०२० मध्ये करण्यात आलेल्या तरतुदीनुसार उपपरिसराचा शैक्षणिक व गुणात्मक विकास, विज्ञान भवन इमारतीचा पहिला मजला बांधणे, अतिथिगृह, संरक्षक भिंत बांधणे, नवीन विभागासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्मिती करणे, मुलांचे वसतिगृह, उपाहारगृह, क्रीडागंण, मूल्यांकन भवन व गोडाऊन व्यवस्थापनशास्त्र विभागाची स्वतंत्र इमारत, जल व भूमी व्यवस्थापन विभागासाठी जल व मृदा प्रयोगशाळा तयार करणे, नगरपालिकेमार्फत किमान तीन इंच मुख्य जलकुंभातून पाणीपुरवठाबाबत मागणी करणे, उपपरिसरातील तलावाचे खोलीकरण करणे, अंतर्गत रस्ते तयार करणे यावर निर्णय झाला.

नवीन विभागासह ज्या विभागासाठी प्रवेशपूर्व परीक्षेबाबत नोंदणी झालेली नाही त्यासाठी मुदतवाढ करणे आदी निर्णय घेण्यात आले. तसेच नवीन विभागासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रभारी विभागप्रमुखांसाठी दालन, मुलींचे वसतिगृह व विज्ञान भवन इमारतीसाठी ५० के.व्ही.चे विद्युत जनित्र जनरेटर खरेदी, उपपरिसरामध्ये सोलर पथदिवे लावणे; तसेच एमआयडीसी प्राधिकरण विद्यापीठाकडून प्रति माह आकारत असलेले अनधिकृत शुल्क रुपये ७५ हजार भरणा बंद करणेबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करणे यावर चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आय क्वॅकतर्फे नॅक मूल्यांकनात सहभागी प्राध्यापकांचा गौरव करण्यात आला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News