आजपासून कोकणासाठी विशेष रेल्वे सुरू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 August 2020
  • गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सेवा धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • राज्य सरकारने शुक्रवारी (ता.14) यास हिरवा झेंडा दाखवला. त्यानुसार कोकणासाठी मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या १८२ फेऱ्या करण्यात येणार आहे.

मुबंई :- गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष रेल्वे सेवा धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने शुक्रवारी (ता.14) यास हिरवा झेंडा दाखवला. त्यानुसार कोकणासाठी मध्य रेल्वे व पश्‍चिम रेल्वेच्या १३ विशेष गाड्यांच्या १८२ फेऱ्या करण्यात येणार आहे. शनिवारपासूनच (ता.15) या गाड्या सोडण्यात येणार आहे. या गाड्यांचे आरक्षणदेखील सुरू करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सावंतवाडी रोड, कुडाळ, रत्नागिरी दरम्यान ८ गाड्यांच्या १६२ विशेष गाड्या चालविणार आहेत; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर ५ विशेष ट्रेनच्या २० फेऱ्या सोडण्यात येणार आहे. या गाड्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे येथून सावंतवाडी रोड आणि कुडाळसाठी धावणार आहे. प्रत्येक गाडीच्या ४ फेऱ्या करण्यात येणार आहेत.
सर्व आरक्षित विशेष गाड्यांमध्ये १३ शयनयान (स्लीपर क्‍लास), ६ आरक्षित सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय वातानुकूलित (एसी - २ टायर), ४ तृतीय वातानुकूलित (एसी- ३ टायर ) डब्बे राहणार आहे. या गाड्यांसाठी १५ ऑगस्टपासून www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग करता येणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले आहे.

नियम पाळणे बंधनकारक

कोकणासाठी जाणाऱ्या सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असणार आहे. प्रवाशांना रेल्वेत प्रवेश करताना, प्रवासादरम्यान आणि इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर कोव्हिड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News